लोकपावत असलेली माणुसकी उमरा वासीयांनी मुक्याप्राण्यात दाखवून दिली
लोहा प्रतिनिधी
लोहा तालुक्यातील उमरा येथे डॉन नावाच्या पाळीव प्राणी कुत्र्याचे माणसाप्रमाणे वाजत गाजत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी मात्र लोकपावत चाललेल्या माणुसकीचे दर्शन उमरा वासीयांनी मुक्याप्राण्यात दाखवून दिले.
माणुसकी ही लोकपावत जात असताना,उमरा या गावांमध्ये माणुसकीचा झरा आजही चालू असल्याचे पहावयास मिळाले.
डॉन चा जन्म २१-११-२०११ रोजी झाला.एका मुक्या प्राण्यावर एवढा जीव लावून अतिशय चांगल्या पद्धतीने या गावांमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.हा प्राणी इतका प्रेमळ निर्मळ आणि अतिशय कर्तव्यदक्ष होता.तो शेतात घरी किंवा गावात आपलं कर्तव्य अतिशय इमानदारीने पार पाडत असे.तो एक घरचा सदस्य म्हणून प्रत्यकाच्या मनामध्ये रुजला गेला होता. तो कुणाचे घर जरी उघड असेल तर तो कुणाच्या दुरडीतली भाकर कधी खात नसायचा.जर कधी जेवण देण्यासाठी आम्हाला उशीर झाला तर तो रुसून बसायचा.
भाकरीवर हमेशा भाजी लागायची भात लागायचा.भाकर चूरून द्यायला लागायची.असा आमच्या परिवाराचा सदस्य आज आम्हाला सोडून गेल्याचे वाघमारे,पट्टेकर,सोनटक्के परिवारातील सदस्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी डॉन च्या अंत्यसंस्कारा वेळी मारोती वाघमारे गंगाधर सिरसाट धर्मा सोनटक्के भगवान वाघमारे दिपक सोनटक्के सुरेश पट्टेकर सुनिल सोनटक्के दिनाजी गवाले मनोहर वाघमारे या सर्वांच्या उपस्थित डॉन ला अखेरचा निरोप दिला.