नांदेड;
लोहा-कंधार तालुक्यातील उर्ध्व मानार प्रकल्पाचे लाभ क्षेत्रात शेती सिचंना साठी तातडीने आर्वतन सोडण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप दादा धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली अधिक्षक अभियंता जलसंपदा विभाग,पाटबांधारे विभाग नांदेड यांना दि 23 नोव्हेबर रोजी निवेदन देण्यात आले.
शिष्टमंडळासोबत चर्चा सकारात्मक होवून २७ तारखेला लिंबोटी धरणाचे पाणी शेती सिंचनासाठी सुटणार असल्याची माहीती यावेळी दिलीप दादा धोंडगे यांनी दिली.
लोहा-कंधार तालुक्यातील उर्ध्वमानार (लिंबोटी) यावर्षी १००% टक्के भरला आसुन लाभ क्षेत्रातील डोगंरगाव, चोंडी, मजरा, हाडोळी, घोडज, गोळेगाव, गगनबीड, किरोडा, धावरी, रायवाडी, बेनाळ, बोरी (खु), बाभुळगाव, मलकापुर, चिखलभोसी, पानभोसी, नवघरवाडी, शेलगाव, धानोरा, पोखरी, वंजारवाडी आदी गांवाना शेती सिंचनाचा लाभ मिळतो, शेतीतील सोयाबीन चे पिक निघुन महीना उलटला आसुन रब्बी हांगामातील हारभरा, गहु, ज्वारी, व उस हळद, पिकासाठी पाण्याची आवश्यकता आहे.
खरे तर जलसंपदा विभाग,पाटबांधारे विभागाकडुन सप्टेबर महीन्यामध्येच पाण्याचे नियोजन करुन पाणी पाळया (आर्वतने) जाहीर कडुन किमान १५ आक्टोबर लाच पहीली पाणी पाळी मिळणे आवश्यक होते.
त्यामुळे हळद तुर कापुस उस पिकाचे नुकसान झाले नसते. आता डिसेबर आला तरी व या भागातील शेतक-यानी मागणी करुनही आपले कडुन काहीही हालचाली झाल्या नाहीत.
स्वतःला स्वयघोषीत सर्व पदव्या लावणारे माननीय आमदार मोहदयांना व आपल्या आधीका-याना कालवा सल्लागार समीतीची बैठक घेऊन पाणी पाळ्याची नियोजन करण्यास वेळ नाही त्यामुळे शेतक-याचे नुसान झाल आहे. व रब्बी हंगामा लाही उशीर झाल्याने उत्पादनावर परीनाम होणार आहे .
त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने आर्वतन सोडुन किमान पुढे होणारे शेतक-याचे नुकसान टाळावे असे निवेदन
अधिक्षक अभियंता जलसंपदा विभाग,पाटबांधारे विभाग नांदेड यांना देण्यात आले.
यावेळी मनोहर पाटील भोसीकर राष्ट्रवादी किसान सभा प्रदेश सरचिटणीस, शिवदास पाटील धर्मापुरिकर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कंधार, दत्ता कारामुंगे कार्याध्यक्ष, विशाल गायकवाड, भिम
शाहीर गौतम पवार, भास्कर पुयड, मनमत कल्याणकर आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.