लोहा (प्रतिनिधी)
यावेळी बैठकीत बोलताना आमदार शामसुंदर शिंदे म्हणाले की लोहा व कंधार तालुक्यात यावर्षी अतिवृष्टीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेले सर्व पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे,
यामुळे मतदार संघातील शेतकरी राजा पूर्ण उद्ध्वस्त झाला असून रब्बी हंगाम व उन्हाळी हंगामात नुकसान झालेल्या माझ्या मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघाले पाहिजे असल्याने उर्ध्व मानार प्रकल्प लिंबोटी धरणाच्या लाभक्षेत्रातील लोहा व कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगाम व उन्हाळी हंगामासाठी उर्ध्व मानार प्रकल्पातील शिल्लक पाण्याची कमतरता भासू देऊ नका व जास्तीच्या पाणी पाळ्या लोहा व कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांना कालव्याद्वारे सोडण्याचे निर्देश यावेळी आमदार शामसुंदर शिंदे यांनी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलताना निर्देश दिले .
उर्ध्व मानार प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे सिंचन व बिगर सिंचन पाण्याचे नियोजन करण्यात साठी या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी सिंचनामध्ये रब्बी हंगाम व उन्हाळी हंगामामध्ये लोहा, कंधार तालुक्यातील उर्ध्व मानार प्रकल्पातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगाम व उन्हाळी हंगामात ५ पाणी पाळ्या सोडण्याचे निश्चित करण्यात आले आहे,
तर रब्बी हंगामात लोहा, कंधार तालुक्यातील उर्ध्व मानार प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील अंदाजे 30 ते 35 गावांना पहिली पाणी पाळी पाळी 2 डिसेंबर रोजी सोडण्यात येणार असून जानेवारी मध्ये दुसरी पाणी पाळी तर फेब्रुवारीमध्ये तिसरी पाणी पाळी सोडण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.
तर उन्हाळी हंगामात दोन पाणी पाळ्या शेतकऱ्यांना देण्याचे ठरविण्यात आले आहे . उन्हाळी हंगामात गरज पडल्यास आणखी वाढीव दोन पाणी पाळ्या देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना सांगितले ,उन्हाळी हंगामात पहिली पाणी पाळी मार्चमध्ये ,तर दुसरी पाणी पाळी एप्रिल मध्ये कालव्याद्वारे सोडण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. कालच्या बैठकीत रब्बी हंगामात तीन पाणी पाळ्या व उन्हाळी हंगामात दोन पाणी पाळ्या अशा पाच पाणी पाळ्या उर्ध्व मानार प्रकल्पातून लोहा, कंधार मतदार संघातील उर्ध्व मानार प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात सोडण्याचे निश्चित करण्यात आले .
उर्ध्व मानार प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील लोहा व कंधार तालुक्यातील 30 ते 35 गावांना रब्बी हंगामातील व उन्हाळी हंगामातील पाणी पाळ्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, या बैठकीस कालवा नियोजन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.