जि.प.प्रा.शाळा देऊळगाव गात ता सेलू येथील उपक्रमशील शिक्षक अशोक रामराव कुंभार यांना दि. 14 नोव्हेंबर 2021 रोजी शेगाव येथे 11 व्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत श्रीमंत भूषणसिंहजीराजे होळकर (अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज, इंदौर) यांच्या हस्ते व ब्रिगेडियर सुधीर सावंत ( मा. खासदार तथा अध्यक्ष सैनिक फेडरेशन), सौ मनीषा ताई पवार (अध्यक्षा जिल्हा परिषद बुलढाणा), व्यंकटराव जाधव( प्रदेशाध्यक्ष, म फुले शिक्षक परिषद) या मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार व मानपत्र प्रदान करण्यात आला.
महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र, यांच्या पुरस्कार निवड समितीने कुंभार सरांच्या शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्याची दखल घेऊन ही राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार 2021 साठी निवड केली.
श्री कुंभार हे विद्यार्थी विकासासाठी नेहमीच विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम
राबवत असतात. पुरस्काराबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.