कंधार
कंधार तालुक्यातील दिग्रस खुर्द या गावांमध्ये एका लग्न समारंभामध्ये अन्नातून विषबाधा होऊन जवळपास 300 च्यावर रुग्णांना विषबाधा झाली काल सकाळी अचानक गावातील नागरिकांची तब्येत बिघडून उलट्या मळमळ पोट दुखी संडास असे प्रकार सुरुवात झाली त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले तात्काळ आरोग्य यंत्रणा सक्रिय होऊन अनेक रुग्णांना कंधार ग्रामीण रुग्णालय कुरुळा प्राथमिक आरोग्य केंद्र दिग्रस उपकेंद्र येथे हलवण्यात येऊन उपचार सुरू करण्यात आले.
ग्रामीण रुग्णालय कंधार येथे उपचार घेत असलेल्या दिग्रस खुर्द येथील 98 रुग्णांची आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी भेट घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करत रुग्णांना धीर देत त्यांच्या वतीने फळ फळावळ बिस्किट वाटप करण्यात आले यावेळी ग्रामीण रुग्णालय कंधार चे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सूर्यकांत लोणीकर, पंचायत समिती सदस्य उत्तमराव चव्हाण,युवा नेते कृष्णाभाऊ भोसीकर कंधार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हमीदभाई सुलेमान,सरपंच सतीश देवकते, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बालाजी चुकलवाड, डॉक्टर महेश पोकळे, डॉक्टर संतोष पदमवार, पत्रकार बांधव स्वप्निल परोडवाड,मधुकर पाटील लुंगारे,वडजे,वाघमारे सिस्टर आदीसह दिग्रस खुर्द येथील नागरिक व ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी संजय भोसीकर यांनी सर्व रुग्णांच्या भेटी घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आवश्यक ते उपचार करणे बाबत विनंती केली यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय भोसीकर म्हणाले की आजच्या या काळामध्ये शहरात व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर लग्न समारंभ सोयरीक साखरपुडा धार्मिक कार्यक्रम इत्यादी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत आहेत यासाठी सर्व यंत्रणेने दक्षता घेणे आवश्यक आहे दिग्रस खुर्द येथील प्रकाराची पुनरावृत्ती परत होऊ नये या बाबतीत सर्व नागरिकांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे असे संजय भोसीकर म्हणाले आरोग्य यंत्रणेने तत्परता दाखवून वेळेच्या आत सर्व रुग्णांचे उपचार केल्याबद्दल नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निळकंठ भोसीकर,वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सूर्यकांत लोणीकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर ढवळे,त्यांचे सर्व आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी सर्व पत्रकार बांधव यांचे आभार मानून कौतुक केले याप्रसंगी डॉक्टर लोणीकर यांनी सर्व रुग्णांची माहिती देऊन यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याची खबरदारी घेण्याचे आवाहन केले