कंधार ; प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यात हर घर दस्तक ही लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या पुढाकाराने हे अभियान राबविण्यात येत असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने दीपक महालिंगे यांनी कंधार येथील लसीकरण विभागाला भेट देऊन आजच्या लसिकरण मोहीमेचा आढावा घेतला आहे.
लसीकरणाला गती वाढावी व लसीकरण सर्वसामान्यांना सहजपणे उपलब्ध होण्यासाठी घराघरांमध्ये लसीकरण हर घर दस्तक लसीकरण विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व मुख्य कार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकूर घुगे यांच्या कल्पनेतून सदर लसीकरण मोहीम राबवली जात आहे .
आज दिनांक 24 नोव्हेंबर रोजी प्रशासनाच्या वतीने दीपक महालिंगे यांनी कंधार येथील लसिकरण विभागाला भेट देऊन आढावा घेतला आहे .
कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सूर्यकांत लोणीकर यांनी कोण्हीड लसिकरण मोहिमेला गती यावी म्हणून नियोजन केले आहे .त्यानुसार दररोज ठरवून दिलेल्या भागात आरोग्य कर्मचारी भेट देऊन लसिकरण केले जात असून दररोज त्याचा आढावा ऑनलाईन द्वारे जिल्हा आरोग्य विभागाला पाठवला जात आहे.