कंधार
नांदेड जिल्ह्यातील सर्व आजी माजी सैनिक व कंधार तालुक्यातील सर्व माय बाप गोर गरीब जनतेच्या सेवेसाठी आणि कंधार तालुका भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आपल्या सेवेत 24 तास काम करण्यासाठी आपल्या तालुक्यात संपर्क कार्यालयाच्या ओपनिंग लवकरच करत असल्याची
माहिती माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी दिली.
गेल्या अनेक दिवसापासून शहरातील विविध कार्यालय मध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे .
माजी सैनिक संघटनेच्या वतीने वेळोवेळी भ्रष्टाचाराचे पाळेमुळे उखडून काढण्याचं काम बालाजी चुकलवाड यांच्या माध्यमातून व माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून चालू आहे.
भ्रष्टाचार मुक्त कंधार तालुका करण्यासाठी कंधार शहरात लवकरच माजी सैनिक संघटनेचे कार्यालय होत आहे.
कंधार कर व कंधार तालुक्यातील जणता माय बापानों कधीही कुठलाही प्राब्लेम झाला तर तात्काळ माजी सैनिक संघटनेच्या या कार्यालयाला संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी माजी सैनिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.