औरंगाबाद ;
बहुजन भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.व्यंकटेश कसबे सर यांचा नुकताच औरंगाबाद जिल्हा दौरा पार पडला. औरंगाबाद, पैठण, गंगापुर , फुलंब्री इत्यादी तालुक्यासह विविध ठिकाणच्या पक्षाच्या वतीने आयोजीत बैठकांतून प्रा. कसबे सरांनी आगामी काळात होऊ घातलेल्या महानगर, नगर पालिका तथा इतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या अनुशंगाने पक्षाच्या तयारीचे परिक्षण केले. स्थानीय होऊ घेतलेल्या निवडणुकांच्या दृष्टीने केलेला राष्ट्रीय अध्यक्षांचा हा दौरा पक्षविस्तारासाठी ही फायद्याचा ठरला
. जिल्ह्यातील विविध बैठकातून बहुजन समाजातील सर्व जाती धर्मांच्या लोकांनी बहुजन भारत पार्टीत मोठ्या संख्येने प्रवेश केला. तर विनोद खंडागळे, विकास उमाप, राजू शिंदे, जॉन शिंदे, केंदळे दिपक, विकी अवचरमल इत्यादींना बहुजन भारत पार्टीची विविध स्तरावरील पदे देऊन सन्मानित करण्यात आले. जागोजागी पार पडलेल्या बैठकांतून राष्ट्रीय अध्यक्षांनी औरंगाबाद जिल्ह्यातील दलित समाजासह इतर गरिब जातीसमुहातील जनतेशी त्यांच्या आडीआडचणी संदर्भाने चर्चाही केली. जिल्ह्यात कायम हिंदू-मुस्लीम वाद वाढवून आमदार, खासदारकीसह नगरपालीका महानगरपालीकाच्या निवडणुका शिवसेना, भाजपा जिंकते तर खरे, पण दुर्दैवाने हिंदू मुस्लिमांसह कुण्याही धर्माच्या गरिबांना ते आजपर्यंत न्याय देऊ शकले नसल्याची मते नागरिकांनी या बैठकतून राष्ट्रीय अध्यक्षासमोर मांडली.
वाळूज, चितेगाव, पंढरपूर इत्यादी ठिकाणी प्रस्थापित झालेल्या औद्योगिक कंपण्याकडून हाप्तेवसुलीत मशगूल असलेली कॉंग्रेस भाजपा सेना राष्ट्रवादी आदी प्रस्थापित पक्षातील स्थानीय नेते इथल्या कंपनी मालकांकडून बहुजन समाजातील कामगारांच्या होत असलेल्या पिळवणुकीकडे ढुंकूणही बघायला तयार नसल्याच्या तक्रारी समोर आल्या. बीडकीन परिसरातील जवळपास 5 ते 10 वर्षापासून कार्यरत असलेल्या 48 कामगारांचे एका कंपनी मालकाकडून नुकतेच निलंबन करण्यात आले असल्याचे ताजे प्रकरणही प्रा. कसबे सरांसमोर आले. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील स्थानीय नेते या बाबतीत मुग गिळून शांत बसल्याचे राष्ट्रीय अध्यक्षांना सांगण्यात आले. यासर्व तक्रारी शांत पणे ऐकून घेऊन यावर स्थानीय प्रशासनास पक्षाच्या वतीने रितसर विचारना करण्याचे सुचना प्रा. कसबे सरांनी बहुजन भारत पार्टीच्या औरंगाबाद जिल्हा नेत्यांना दिल्या.
त्याच प्रमाणे उद्योग मंत्र्याशी या बाबतीत बोलून हा प्रश्न तडीस नेण्याची ग्वाही सुध्दा राष्ट्रीय अध्यक्षांनी पिडीत कामगारांना भेटून दिली. त्याच प्रमाणे 1992 पासून केंद्रातील कॉंग्रेस सरकार च्या माध्यमातून सुरू केलेले खाजगीकरनाचे षड्यंत्र हे आजचे केंद्रातील भाजपाचे सरकार कॉंग्रेस पेक्षाही मोठ्या निष्ठुरपणे राबवित असल्याचे प्रा. कसबे सरांनी जिल्ह्यातील विविध बैठकातून स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे या प्रस्थापित पक्षांच्या भांडवलशाही धोरनाला रोखून बहुजन समाजाला यांच्या आर्थिक गुलामीतून मुक्त करण्यासाठी बहुजन भारत पार्टीला मजबुत करण्याचे अव्हानही त्यांनी या औरंगाबाद जिल्ह्यातील दौ-यात जागोजागच्या बैठकातून केले. या संपुर्ण दौ-यात त्यांच्यासोबत बहुजन भारत पार्टीचे प्रदेश महासचिव तथा औरंगाबाद जिल्हाप्रभारी व इतर पदाधिकारी होते.