भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय नगरपरिषद कंधार येथे भारतीय संविधान दिवस साजरा


कंधार:- आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय नगरपरिषद कंधार येथे भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.

यावेळी सर्वप्रथम मोहम्मद रफीक सत्तार स. ग्रंथपाल यांनी संविधान दिनाचे थोडक्यात महत्त्व सांगितले. व संविधान प्रस्ताविक फलकास श्री शेषराव वाघमारे, व मोहम्मद रफीक सत्तार स. ग्रंथपाल यांनी पुष्पहार अर्पण केले. व संविधान ग्रंथास पुष्प अर्पण केले तसेच सर्व वाचकांनी संविधान ग्रंथाचे वाचन करावे असे आवाहन केले.

ग्रंथालय कर्मचारी मिलिंद महाराजांनी सविधान प्रस्ताविकाचे वाचन केले, यांच्यासोबत सर्व कर्मचारी व उपस्थित वाचकांनी सामूहिक वाचन केले. यावेळी मोठ्या संख्येत वाचक उपस्थित होते.

यासाठी मिलिंद महाराज, कीशन भालेराव, राधाबाई जवादवाड, यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *