अहमदपूर ( प्रतिनिधी ) ( प्रा भगवान आमलापुरे ) सध्या निर्माणाधीन असणाऱ्या परभणीच्या बसस्थानका समोरच्या न्यु महाराष्ट्र हाँटेलमध्ये गुळाचा साधारण गोड चहा पिल्यानंतर परवा दि १८ नोव्हें २१ रोजी आपल्या,’पुरोगामी कवी परिषद ‘ या व्हाट्सएप ग्रुपचे सन्मानीय सदस्य एन डी राठोड सर आणि त्यांचे १९८४ चे वर्गमित्रं, सध्या सहाय्यक वाहतूक निरिक्षक या पदावर परभणी एसटी बस विभागात कार्यरत असणारे हरिदास नामदेवराव दामपुरीकर जवळपास ३० वर्षानंतर आँफलाईन गप्पात रंगले असताना मला त्यांना कँमेऱ्यात कैद करण्याचा मोह आवरता आला नाही.
तसं पाहिलं तर मी ऐकून आहे की जुने धान्य खावे, जुनी दारु प्यावी, जुन्या मित्रांना भेटावं. शेवटी old is gold. जुने ते सोने असते. असे म्हणतात. नामदेवसुत निखील सुक्रे यांच्या शब्दात सांगायचे झाले तर मी म्हणेल,’ मित्र कधीच जुना होत नसतो.’ या म्हणीचा आणि कवितेचा प्रत्यक्ष अनुभव परवा एन डी राठोड आणि ह ना दामपुरीकर यांच्या भेटीत आला.
जवळपास ३० वर्षापूर्वी परभणी येथील तत्कालीन मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि आताचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील क्रषीतंत्र विद्यालयात आपल्या ग्रुपचे सदस्य एन डी राठोड सर शिकायला होते. कालपरवापर्यंत एन डी सर आणि ह ना सर आँफलाईन भेटत असत. परवा दि १८ नोव्हें २१ रोजी जवळपास ३० वर्षानंतर प्रत्यक्ष भेट झाली आणि गप्पांची मैफिल रंगली.
ह ना सर सध्या सहाय्यक वाहतूक निरिक्षक एसटी बस विभाग परभणी येथे कार्यरत आहेत. यापुढे ते फक्त ०९ महिने आणि काही दिवस कामावर असणार आहेत. नियत वयोमानानुसार ते दि २१ आँगस्ट २२ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. गुळाचा साधारण गोड असणारा चहा पिल्यानंतर या दोन हस्ती विविध विषयांवर भरभरून बोलल्या. एक दोन मित्रांच्या आठवणी ताज्या केल्या.
आमचे सहकारी ड्रायव्हर दत्तात्रय कांबळे यांनी पण चहा घेतला आणि गाडीजवळ जाऊन बसले. एसटी बस संपाबाबत ह ना सर म्हणाले परभणीत सारे काही थंड आहे. गंगाखेडला कदाचित परभणी पेक्षा जास्त गंगेच्या वाळूचा पाझरा असावा. त्यामुळे तिथे दररोज नवनवीन कार्यक्रम सुरू आहेत. शिवाय तेलंगणा सरकारने सत्तेवर आल्यानंतर तिसऱ्या दिवशी विलीनीकरण केले मग आपल्या सरकारला काय अडचण आहे, एसटीचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करायला.?
त्यावेळी शिकायला असताना तीन रुपयांचे दोन पोष्टक आणि चविष्ट मुगवडे आम्ही सर्व वर्गमित्रं या बसस्थानका शेजारी खायचो. आम्हाला तेंव्हा ६५ रुपये प्रति महिना शिष्यवृत्ती भेटायची. ही आठवण पण सांगितली.
मी धर्मापुरीत काँलेजवर कार्यरत आहे. असे सांगितल्यावर ह ना सरनी माजी आमदार मोहन फड यांचे चिरंजीव अपक्ष उमेदवार निवडून सुद्धा कसे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. ही माहिती दिली.
या भेटीत मला शिवहार राहूले शिरडशहापुर, नागेश सोनटक्के भेंडेगाव,नागेश खिल्लारे टेंभुर्णी, दत्तात्रय कांबळे अहमदपूर , अमर पाटील लाळी आणि भगवान महाराज पुंड हे नवीन मित्र मिळाले. पण पाणी कधीच शिळे होत नाही. असे विज्ञान सांगते.तसं मित्र कधीच जुने होत नाहीत. हे पण खरे आहे. नामदेवसुत निखील सुक्रे यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास,
मित्र कधीच जुना होत नसतो
भांडल्याने उणा होत नसतो.
दोस्ती…….
काळजाचा विषय असतो मित्रांनो
मित्र जोडल्याने गुन्हा होत नसतो.
गप्पांच्या शेवटी, तुमच्या निरोप समारंभास आणि एका नवीन इनिंगला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही अहमदपूरहुन अवश्य येऊ,असा शब्द एन डी सरनी ह ना सरांना दिला आणि आम्ही तुकाराम कांबळे यांच्या मदतीने अहमदपूरला रवाना झालो.