कंधार ; प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान ही जगाला दिलेली देणगी आहे .सर्वत्र 26 नोव्हेंबर रोजी ठिक ठिकाणी संविधान दिन म्हणून साजरा केला जातो तसेच संविधान वाचन करून व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येते परंतु तालुक्यातील राष्ट्रवादीचे कंधार तालुका अध्यक्ष रामचंद्र येईलवाड यांनी आपल्या नातवाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. वाढदिवसानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाची प्रत यांच्या प्रतिमेची पूजा करून (नातवाचा) यशवंत चा वाढदिवस साजरा केला आहे.
26 नोव्हेंबर 20 21 रोजी चिरंजीव यशवंत हा सात वर्षे पूर्ण झालेला आहे . संविधान दिवस 26 नोव्हेंबर या दिवशी या नातवाचा जन्म झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाचे पूजन करून नातवाचा वाढदिवस साजरा अनोखा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.

यापूर्वी रामचंद्र येइलवाड यांनी लक्ष्मी पुजना निमित्त सुनबाई व पत्नीचा सन्मान करून लक्ष्मी पुजन केले होते तसेच अनेक धार्मिक कार्यक्रम सामाजिक उपक्रमांनी साजरा करून समाजाला जागृती करण्याचे कार्य यईलवाड कुंइंबीया कडून केले जात असते.