कंधार ; प्रतिनिधी
श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार या ज्ञानालयात भारतरत्न,बोधीसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधान अंगीकृत केलेला दिन साजरा करुन, मुंबई अतिरेकी हल्यात धारार्तीर्थी पडलेल्या शहिद वीरांना विनम्र अभिवादन करण्यात आले.मुख्याध्यापक सदाशिव आंबटवाड सर यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे संस्थापक व संचालक, वयाची शतक पार करणारे शतकवीर, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार व आमदार, विद्रोही विचारवंत मुक्ताईसुत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांनी संविधानकार डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रास अन् संविधानाच्या प्रास्ताविकेस अत्तर तेल लावून अभिवादन केले.या कार्यक्रमात संविधान कलम बहाद्दर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले,
त्यांचे प्रतिक म्हणून लेखणी सर्व 400 विद्यार्थ्यांना लेखणीची भेट सुलेखनकार गोपाळसुत दत्तात्रय एमेकर यांचे वतीने देण्यात येवून संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात येवून संविधान साजरा करण्यात आला.या वेळी मुख्याध्यापक सदाशिव आंबटवाड सर यांच्या समर्थ हस्ते नुतन पर्यवेक्षक तुकाराम कारागीर सर यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात प्रा.संग्राम कौंसल्ये सर यांनी संविधान निर्मितीचा इतिहास आपल्या आभ्यासपुर्ण भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
हायस्कूलचे संस्कृत विषयाचाचे आचार्य भिष्माचार्य आर्य सर यांनी प्रत्येक वर्गास एक या प्रमाणे आपल्या स्व हस्त हस्तकलेतून डस्टर भेट स्वरुपात वाटप करण्यात आले.या वेळी उपमुख्याध्यापक डी.पी.कदम सर,पर्यवेक्षक रमाकांत बडे सर, माजी मुख्याध्यापक सूर्यकांत पुणे सर, प्रा.सदानंद कांबळे सर,प्रा.हिदायत बेग सर,प्रा.मुनिर सर,प्रा. अशोक वरपडे सर,प्रा.शरद शेट्टे सर,प्रा.अक्कनगीरे सर,प्रा.बामणे सर, प्राध्यापिका पवार मॅडम,प्रा.वाडीकर सर, आनंदराव भोसले सर,शिक्षक प्रतिनिधी वैभव कुरुडे सर,
उमाकांत चिवडे सर,सुरेश घोरबांड सर,भास्कर आकुलवाड सर,अझर बेग सर, प्रकाश पवार सर,सुरेश इरलवाड सर,शेख ऐनोद्दीन सर,गंगाराम खुडे सर,धोंडगे मॅडम, शिरसे मॅडम,वडजे मॅडम, परसू अण्णा,चोकले सर, छायाचित्र अझर बेग सर व गजाजन बापुर्डे आदीजण उपस्थित होते.उत्कृष्ट सुत्रसंचलन संदीपकुमार कांबळे सर तर २६\११ हल्ल्याचा वृतांत ग्रंथपाल दत्तात्रय एमेकर यांनी सांगताच कार्यक्रमाची सांगता झाली.