महात्मा जोतीराव फुले यांना अभिवादन व महारक्तदान शिबीर संप्पन

अहमदपूर : प्रा.भगवान आमलापुरे

रविवार दिनांक 28 नोव्हेंबर 2021 रोजी राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतीदिन व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महापरिनिर्वाण दिन निमित्त महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने..राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेला व भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या “स्मृतीदिन” (28 नोव्हेंबर) निमित्त… व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “महापरीनिर्वाण (06 डिसेंबर) दिन निमित्त….महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र च्या वतीने अहमदपूर येथे कै.व्हि.डी देशमुख शासकिय रक्त संक्रमण पेढी च्या सहकार्याने “महा रक्तदान शिबीर” आयोजित करण्यात आले असता त्याचा शुभारंभ महात्मा फुले ब्रिगेड लातूर जिल्ह्याचे सहसचिव देवराज गोरे व सोमेश्वर भंडे यांनी रक्तदान देऊन अभिवादन केले.

त्या नंतर VBA चे तालुका प्रवक्ते बाबासाहेब वाघमारे व जिल्हा उपाध्यक्ष विनय कुमार ढवळे, फुले प्रेमी राजुभाऊ कल्याणे (अंधोरीकर), महात्मा फुले ब्रिगेड शहराध्यक्ष राम शिंदे, अक्षय कस्पटे, ऋषीं कस्पटे व अमोल कच्छवे इत्यादी रक्तदात्यानी रक्तदान करुन “महा रक्तदान शिबीर” यशस्वी केले.


अभिवादन व रक्तदान शुभारंभ कार्यक्रम साठी माजी मुख्याध्यापक तथा माजी नगर सेवक शेषेराव ससाने, वंचित बहुजन अघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष विनयकुमार ढवळे, तालुका अध्यक्ष सहदेवजी होनाळे (अप्पा), व तालुका प्रवक्ते तथा स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब वाघमारे, न्युज महाराष्ट्र टुडे चॅनलचे प्रमुख त्रिशरण वाघमारे, महात्मा फुले ब्रिगेड चे प्रदेश सरचिटणीस उत्तम जी. गोरे, प्रदेश उपाध्यक्षा श्रीमती वर्षा माळी,

जिल्हा संपर्क प्रमुख ज्ञानोबा डाके, तालुका उपाध्यक्षा सौ. कविता गोरे, शहराध्यक्ष राम शिंदे, शहर उपाध्यक्ष बाबुराव आरसुडे, विश्वनाथ माळी, महेश आरसुडे, वेदिका माळी, समर्थ गोरे यांच्यासह सन्मानीय नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *