वचननाम्यातील आ. श्यामसुंदर शिंदे यांच्याकडून वचनपूर्ती ;लोहा – कंधार विधानसभा मतदार संघात 24 जलसिंचन प्रकल्पाला मिळवली मंजुरी

लोहा ,क: प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत मतदारांना जो वचननामा दिला होता त्या वचननाम्यातील पिण्याच्या आणि सिंचनाचे पाणी, उत्तम आरोग्य या वचनाची परिपूरतता आमदार शामसुंदर शिंदे यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक पूर्ण करून घेतली आहे. लोहा कंधार विधानसभा मतदार संघात 24 जलसिंचन प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून लोहा येथे शंभर खाटांचे तर कंधार येथे अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालय लवकरच कार्यान्वित होणार आहेत .त्यामुळे ‘ बोले तैसे चाले ….’ या उक्तीची प्रचिती आली आहे .


लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत श्यामसुंदर शिंदे यांच्याकडून मतदारांना जो वचनामा दिली होता.जी आश्‍वासने दिली होती ती आश्वासने आणि त्या वचनांची पूर्तता करण्यात येत आहे .आपल्या मतदारसंघात पिण्याचे पाणी प्रत्येकाला मिळाले पाहिजे ,शेतीसाठी सिंचनाची पाणी उपलब्ध झाले पाहिजे, हा भाग सुजलाम सुफलाम झाला पाहिजे असे स्वप्न उराशी बाळगून काम करणारे माजी सनदी अधिकारी तथा आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी लोहा कंधार विधानसभा मतदार संघासाठी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प मंजूर करून घेतले आहेत. औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या मध्ये गोदावरी उर्ध्व पेनगंगा प्रकल्प आणि पैन गंगा खोऱ्यातील कामाच्या आढव्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मराठवाड्यासाठी हक्काचे पाणी देण्यात आली आहे. यानुसार लोह आणि कंधारमध्येही नवीन साठवण तलाव उभारणीसाठी मंजुरी देण्यात आली आहे .


गुंडा (उमरा) मलकापूर, दहिकळंबा, सावरगाव, जानापुरी ,शेलगाव, सावळेश्वर, लाठ खुर्द, मडकी निळा, करमाळा, पिंपळदरी, कापसी, जोमेगाव, येळी, नांदगाव, मारतळा, नगरवाडी, देऊळगाव कामळजवाडी ,करमाळा, दोनपरशुराम तांडा, आणि हळदा या 24 ठिकाणी नवीन साठवण तलावांना मंजुरी देण्यात आली आहे .या कामाला लवकरच सुरुवात होणार असून या भागातील पिण्याच्या आणि सिंचनासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागणार आहे.


पिण्याच्या पाण्यासोबतच नागरिकांचे सार्वजनिक आणि वैयक्तिक आरोग्य उत्तम असावे यासाठी आ. शामसुंदर शिंदे यांनी लोहा येथील ग्रामीण रुग्णालयात शंभर घाटांची मंजुरी मिळवून घेतली होती. शिवाय अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या अनुषंगाने भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे.

त्यामुळे लोहा येथील 100 खाटांचे अद्यावत असे रुग्णालय लवकरच रुग्णसेवेसाठी सज्ज असणार आहे. कंधार येथील जनतेच्या सर्व उत्तम आरोग्यासाठी नव्या ग्रामीण रुग्णालयाची मंजुरी मिळवून घेतली आहे. त्यामुळे दोन्ही रुग्णालय येत्या वर्षभरात रुग्णसेवेसाठी सज्ज असणार आहेत. सर्वसामान्य आणि शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचली पाहिजे यासाठी आमदार शामसुंदर शिंदे यांचा सततचा पाठपुरावा सुरू आहे. केवळ बोलून जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा कामे करून लोकांची सेवा करावी या उदात्त हेतूने आमदार श्यामसुंदर शिंदे यांची राजकीय समाजकारणाची नवी वाटचाल लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील जनतेला पाहावयास मिळत आहे.

लोहा कंधार विधानसभा मतदार संघात या पूर्वी विकासाची कामे झाली नाहीत ती कामे आता नव्याने होत आहेत . अनेक कामांना गेल्या पंधरा वर्षांपूर्वी मान्यता मिळाली होती मात्र निधी उपलब्ध करून घेण्यास त्या परिस्थितीतील लोकांना अडचणी आले असतील.आता त्या काळात मंजूर झालेली काम नव्याने सुरू करण्याचा संकल्प आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी केला आहे.

त्यामुळे लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात येत्या वर्षभरात विकासाची कामे पूर्ण होतील असा विश्वास आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी व्यक्त केला आहे. एवढेच नाही तर निवडणुकीच्या काळात वचननामा जाहीर केला होता त्या वचननाम्यातील आश्वासनाची पूर्तता करताना मला सर्वस्वी आनंद होत असून आनंद आमच्या मतदार संघातील सर्व जनतेसाठीचा आहे अशा भावनाही आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी व्यक्त केल्या.


दरम्यान लोहा कंधार विधानसभा मतदार संघात चोविस सिंचन प्रकल्प आला मंजुरी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि जलसंपदा सचिव अजय कोहिनकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आज आमदार शामसुंदर शिंदे यांनी आभार मानले.

त्यांच्यासोबत युवा नेते विक्रांत दादा शिंदे होते तर हा निधी मिळवून देण्यासाठी सहकार्य करणारे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचेही आमदार शामसुंदर शिंदे यांनी आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *