24 जलसिंचन प्रकल्पाला मंजुरी बदल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील याचे आमदार शामसुंदर शिंदे यांनी मानले आभार

लोहा ,कंधार: प्रतिनिधी :

लोहा कंधार विधानसभा मतदार संघात चोविस सिंचन प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि जलसंपदा सचिव अजय कोहिनकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आज सोमवार दि 29 नोव्हेबर रोजी आमदार शामसुंदर शिंदे यांनी आभार मानले.

लोहा कंधार विधानसभा मतदार संघात 24 जलसिंचन प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून लोहा येथे शंभर खाटांचे तर कंधार येथे अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालय लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहीती आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी दिली असून

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मराठवाड्यासाठी हक्काचे पाणी देण्यात आली आहे. यानुसार लोह आणि कंधारमध्येही नवीन साठवण तलाव उभारणीसाठी मंजुरी देण्यात आली आहे .

गुंडा (उमरा) मलकापूर, दहिकळंबा, सावरगाव, जानापुरी ,शेलगाव, सावळेश्वर, लाठ खुर्द, मडकी निळा, करमाळा, पिंपळदरी, कापसी, जोमेगाव, येळी, नांदगाव, मारतळा, नगरवाडी, देऊळगाव कामळजवाडी ,करमाळा, दोनपरशुराम तांडा, आणि हळदा या 24 ठिकाणी नवीन साठवण तलावांना मंजुरी देण्यात आली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *