प्रा.डॉ.रामकृष्ण बदने यांना विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान


मुखेड -ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान)महाविद्यालय वसंतनगर ता. मुखेड जि.नांदेड येथील माजी प्राचार्य तथा हिंदी विभागात कार्यरत प्रसिद्ध साहित्यिक तथा वक्ते प्रा.डॉ.रामकृष्ण बदने यांना ०१ डिसेंबर २०२१ रोजी विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षक( ग्रामीण )पुरस्कार जागतिक कीर्तीचे नेत्रतज्ञ डॉ.तात्याराव लहाने यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उध्दवजी भोसले हे होते.


प्रा.डॉ.बदने यांनी मागील अनेक वर्षापासून संशोधन, लेखन, व्याख्यान व अन्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांनी व त्यांच्या सौभाग्यवती दैवशाला बदने यांनी स्वीकारला. या वेळी डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.नागनाथ कोतापल्ले, माजी मंत्री बाळासाहेब जाधव,विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ, जोगेंद्र सिंह बिसेन, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ सर्जेराव शिंदे,आ. बाबासाहेब पाटील,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास राठोड, सिनेट सदस्य डॉ.संजीव रेड्डी, महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. गुरुनाथ कल्याण,स्टाफ सेक्रेटरी डॉ. व्यंकट चव्हाण,कार्यालय अधीक्षक रमेश गोकुळे, वीरभद्र भालेराव,चिरंजीव ज्ञान बदने हे उपस्थित होते.


या वेळी वरील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुरस्कार याच महाविद्यालयातील लिपिक विरभद्र भालेराव यांनाही प्रदान करण्यात आला. या दोघांचेही अभिनंदन खालील मान्यवरांनी केले आहे.


त्यात विमुक्त जाती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कर्मवीर किशनराव राठोड, संस्थेचे विद्यमान सचिव प्राचार्य गंगाधरराव राठोड,मुखेडचे आमदार डॉ. तुषारजी राठोड,संस्थेचे सहसचिव गोवर्धन पवार,सदस्य संतोष राठोड, संस्थेचे सदस्य मुख्या.गोविंद पवार,वि.जा.से. समितीतील सर्व शाखाप्रमुख,सर्व प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,

मायबोली मराठी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी आंबुलगेकर, संस्थापक सचिव ज्ञानोबा जोगदंड,विद्यमान सचिव एकनाथ डुमणे, लोकसंकेत वृत्तपत्राचे संपादक नामदेव यलकटवार, मायबोली परिवारातील सर्व सदस्य मुखेडच्या विविध चळवळीतील मान्यवर तसेच मित्र,आप्तेष्ट, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *