नांदेड/ येथील -श्री स्वामी समर्थ फाउंडेशन, व श्री चंद्रप्रभा होमिओ क्लिनिक, नांदेड. आणि नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या 82 व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार, दि.3 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता चंद्रप्रभा होमिओ क्लिनिक, गार्गी हाईटस, शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ, गोकूळ नगर, नांदेड येथे पत्रकार, मिडीयातील सर्व कर्मचारी, वृत्तपत्र विक्रेते व त्यांच्या कुटुंबीयांची मोफत आरोग्य तपासणी व होमिओपॅथिक औषध उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी श्री. स्वामी समर्थ फाउंडेशन, नांदेड यांच्या फिरत्या होमिओपॅथी दवाखान्याचा लोकार्पण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास उदघाटक म्हणून जिल्हाधिकारी डॉ.विपिन ईटनकर हे तर अध्यक्ष म्हणून मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, प्रमुख अतिथी म्हणून जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकूर-घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक तथा होमगार्डचे जिल्हा समादेशक निलेश मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी विकास माने,
अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव कुळकर्णी, मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी, विभागीय सचिव प्रकाश कांबळे, माजी सरचिटणीस चारूदत्त चौधरी, वृत्तपत्र वितरक संघटनेचे सरचिटणीस बालाजी पवार, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, डॉ. हंसराज वैद्य, शिरिष पुरोहित, प्रसिद्ध उद्योगपती अब्दुल वहिद शेठ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष ऍड.प्रदीप नागापूरकर, कार्याध्यक्ष गोवर्धन बियाणी, सुभाष लोणे, होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ.अशोक बोनगुलवार, नितिन बोनगुलवार, महानगराध्यक्ष विश्वनाथ देशमुख, रविंद्र संगनवार, अभय कुळकजाईकर यांच्या सह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.