नांदेड – अ. भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चार दिवसांच्या आॅनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संविधान या विषयावरील चार व्याख्यान आॅनलाईन पद्धतीने दररोज रात्री ८.०० वा. महाराष्ट्रातील विविध विचारवंत देणार असल्याची माहिती व्याख्यानमालेचे निमंत्रक प्रशांत वंजारे यांनी दिली.
महामंडळाच्या अधिकृत फेसबुक पेजवर चार दिवसीय ( लाईव्ह) संविधान व्याख्यानसत्र दिनांक ३ डिसेंबर ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत चालणार आहे. पहिले पुष्प प्रा. माधव सरकुंडे हे गुंफणार असून संविधानातील धर्मनिरपेक्षता या विषयावर ते मार्गदर्शन करतील. चार डिसेंबर रोजी डॉ. शैलेंद्र लेंडे हे संविधानातील लोकशाही या विषयावर बोलतील तर पाच रोजी संविधानाला अभिप्रेत भारत या विषयावर डॉ. अनमोल शेंडे हे प्रकाश टाकतील.
व्याख्यानमालेचा समारोप प्रख्यात आंबेडकरी विचारवंत यशवंत मनोहर हे करणार आहेत असे व्याख्यानमालेचे समन्वयक गंगाधर ढवळे यांनी कळविले आहे.
व्याख्यानमालेच्या यशस्वी आयोजनासाठी महामंडळाच्या अध्यक्षा सीमाताई मोरे, सचिव छायाताई खोब्रागडे, उपाध्यक्ष अमृत बनसोड, मधू बावलकर, संजय डोंगरे, सहसचिव सुरेश वंजारी, तक्षशील सुटे, पवन भगत, कार्याध्यक्ष गंगाधर ढवळे, प्रवीण कांबळे, कार्यालयीन सचिव संजय मोखडे,
निमंत्रक प्रशांत वंजारे, केंद्रीय सदस्य सुनंदा बोदिले, विलास थोरात, संजय शेजव, संघपाल सरदार, राजेश नाईक, राजेश गरुड, आत्माराम ढोक, सिद्धार्थ मेश्राम, देवानंद सुटे, सुरेश खोब्रागडे, भास्कर पाटील, गजानन बनसोड हे प्रयत्नशील आहेत. या अॉनलाईन व्याख्यानमालेचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.