१३ डिसेंबर २०२१ पासुन ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते ४ थी व शहरी भागातील इयत्ता १ ली ते ७ वीचे वर्ग सुरु करण्याचा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचा निर्णय

नांदेड ;

१३ डिसेंबर २०२१ पासुन ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते ४ थी व शहरी भागातील इयत्ता १ ली ते ७ वीचे वर्ग सुरु करण्याचा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचा निर्णय

जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड. परिपत्रक

4883

जाक्र जिपना/शिअ/मा-८/२०२१-२२/ दिनांक-३०/११/२०२९.

शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण: २०२१/प्र.क्र.१७८/एसडी-६ दिनांक-२९/११/२०२१ अन्वये राज्यातील ग्रामीण •भागातील इयत्ता १ ली ते ४ थी व शहरी भागातील इयत्ता १ ली ते ७ वीचे वर्ग दिनांक ०१ डिसेंबर २०२१ पासून सुरु करण्यात येत असल्याचे कळविले आहे. प्रस्तुत शासन निर्णयात सर्व शिक्षकांचे शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे लसीकरण पुर्ण करणे आवश्यक आहे. तसेच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, आयुक्त महानगरपालिका यांनी याबाबींचा आढावा घेवून शाळा सुरु करणे बाबत आवश्यक तेथे संबंधितांना सुचना कराव्यात असे नमूद आहे.

नांदेड जिल्हयात कोविड-१९ लसीकरणाची स्थिती व कोविड-१९ चा नवीन व्हेरिएंट ओ मायक्रॉन ची भिती सर्वत्र निर्माण झाली आहे. जिल्हयातील लसीकरणाची स्थिती पाहता वरील शासन परिपत्रकानुसार शाळा सुरु करणे उचित होणार नाही. त्यामुळे साथरोग अधिनियम-१८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-२००५, महसूल, वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग मंत्रालय मुंबई- क्र डीएमयू / २०२० /प्रक्र-९३/डीआयएसएम-१ दि. २७/११/२०२१ आणि परिपत्रक क्रमांक जाक़ जिपनां/ कोविड/५७११ दि. २८/११/२०२९ अनुसार नांदेड जिल्हयात वरील परिपत्रकानुसार दिनांक १२ डिसेंबर २०२१ पर्यंत लसीकरण करण्यासाठी विशेष मोहीम राबवून लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याचे उददिष्ट ठरविले आहे. नांदेड जिल्हयात लसीकरणाचे प्रमाण वाढल्याबाबत आढावा घेवून दिनांक १३ डिसेंबर २०२१ पासुन ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते ४ थी व शहरी भागातील इयत्ता १ ली ते ७ वीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल.

ज्या वर्गाची शाळा सदयस्थितीत सुरु आहे, ती पूर्वी प्रमाणेच सुरु राहील. परंतु शाळेत येणा-या विदयार्थ्याच्या घरातील १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींचे प्रथम अथवा द्वितीय डोस झाल्याचे प्रमाणपत्र घेवूनच विदयार्थ्यांना शाळेत प्रत्यक्ष प्रवेश दयावा. तसेच दिनांक १३ डिसेंबर २०२१ पासून इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत सर्व विदयार्थ्यांच्या घरातील १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींचे लसीकरण पुर्ण झाल्याची खात्री शालेय प्रशासनाने करावी.

(डॉ. विपिन भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *