जिल्हा परिषद हायस्कूल घुंगराळा येथे सॅनिटरी नॅपकीन पॅड वाटप.

नायगाव ; प्रतिनिधी

विश्वलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कहाळा(खु) यांच्या संयुक्ताने मुलींना व महिलांना मासिक पाळी व सेंद्रिय सॅनिटरी नॅपकिन पॅड बद्दल जिल्हा परिषद हायस्कूल घुंगराळा ता.नायगाव जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य सौ प्रणिता ताई चिखलीकर या होत्या यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले .

सौ प्रणिता ताई चिखलीकर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की स्त्री स्वाभिमान
आज सावित्रीच्या मुली विविध क्षेत्रात बाजी मारत आहे हे निश्चित अभिमानास्पद आहे . याच बरोबर आपल्या आरोग्याकडे सुद्धा तेवढंच जबाबदारीने लक्ष देऊन. स्वतः ला जपलं पाहिजे.
समज गैरसमज याबद्दल मुलीशी चर्चा केली प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मनोगत व्यक्त केलं.

याप्रसंगी उपस्थित
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बोडके सर, विजय पांचाळ,व्यंकटराव पा. सुगावे ,माधव ढगे-शालेय शिक्षण समिती अध्यक्ष ,श्याम ढगे-तंटा मुक्ती अध्यक्ष , यांसह प्रतिष्ठित नागरिक , शिक्षकेत्तर बंधू-भगिनी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *