नांदेड – येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या पहिल्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी येथील ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे निवडपत्र वाघमारे यांना प्राप्त झाले असून नवयान बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गोणार ता. कंधार येथे एकदिवसीय ग्रामीण साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव अमोल गोणारकर यांनी दिली.

एकदिवसीय जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन, परिसंवाद, परिचर्चा, कथाकथन, एकपात्री प्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम, पुरस्कार वितरण, कविसंमेलन आदी कार्यक्रम होणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे यांची चितपट, माझ्या नजरेतून बाबासाहेब, दंगल घडविण्याचा परवाना, धुतलेलं मातरं, नदर आदी पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांचे साहित्यविषयक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य लक्षात घेऊन आयोजक संस्थेने संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. याबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

