लोहा-कंधार मतदारसंघात नवीन चार विद्युत उपकेंद्राना तात्काळ मंजुरी व निधी द्या -आमदार शामसुंदर शिंदे

आमदार शामसुंदर शिंदे यांनी मंत्रालयात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन दिले निवेद

कंधार, (प्रतिनिधी)


महावितरण नांदेड ग्रामीण विभागामार्फत लोहा, कंधार मतदार संघातील 4 नूतन विद्युत उपकेंद्राना तात्काळ मंजुरी देऊन उपकेंद्राच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा म्हणून काल मंगळवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी मंत्रालयात राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन निवेदन दिले, व मतदारसंघातील विजेच्या समस्या बाबत सखोल चर्चा केली.

मतदारसंघातील नवीन उपकेंद्रांमध्ये लोहा येथे 220 केव्ही उपकेंद्र, मौजे हातणी तालुका लोहा येथे 33 केव्ही उपकेंद्र, दापशेड येथे 33 केव्ही उपकेंद्र व कंधार तालुक्यातील उमरज पाटी येथे 33 केव्ही उपकेंद्र या नवीन चार विद्युत उपकेंद्राना तात्काळ मंजूरी व निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी आमदार शामसुंदर शिंदे यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.

लोहा व कंधार हे दोन्ही तालुके अविकसित असून दोन्ही तालुक्यातील मोठा भाग दुर्गम व डोंगराळ असल्याने मतदारसंघातील विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणात असून या भागात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे व वेळोवेळी कमी दाबाने पुरवठा होणाऱ्या विजे मुळे वेळोवेळी रोहित्र व शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी जळत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील रब्बी व खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान होत आहे

,यामुळे मतदार संघातील शेतकऱ्यांमध्ये महावितरण व लोकप्रतिनिधी विषयी असंतोष असल्याचे दिसत आहे, तसेच मतदारसंघातील प्रस्तावित विविध सिंचन प्रकल्प व त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात विजेच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी लोहा, हातणी, दापशेड व कंधार तालुक्यातील उमरज पाटी येथे नवीन विद्युत उपकेंद्र होणे अत्यंत गरजेचे असल्याने या नवीन 4 विद्युत उपकेंद्रांना तात्काळ मंजूरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी आमदार शामसुंदर शिंदे यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे .

यावेळी लोहा, कंधार मतदार संघातील नवीन 4 विद्युत उपकेंद्रा ना तात्काळ मंजुरी व निधी उपलब्ध करून दिला जाईल असे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितल्याचे आमदार शामसुंदर शिंदे यांनी बोलताना सांगितले. आमदार शामसुंदर शिंदे यांनी लोहा ,कंधार मतदार संघात आजपर्यंत कोट्यवधी रुपयांची विविध विकास कामे मंजूर करून आणली असून नुकतेच आमदार शिंदे यांच्या पाठपुराव्याने मतदारसंघात 24 नवीन सिंचन तलावाला शासनाने नुकतीच मंजुरी दिली असल्याने आमदार शिंदे यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतील जाहीरनाम्यात जनतेला दिलेल्या वचनांची पूर्तता विविध विकास कामाच्या माध्यमातून करीत असल्याने आमदार शिंदे यांचे मतदारसंघातील जनतेतून कौतुक व अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *