मुखेड -ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान)महाविद्यालय वसंतनगर ता. मुखेड जि.नांदेड येथील वरीष्ठ लीपीक या पदावर कार्यरत असलेले श्री विरभद्र रामा भालेराव यांना ०१ डिसेंबर २०२१ रोजी विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार जागतिक कीर्तीचे नेत्रतज्ञ डॉ.तात्याराव लहाने यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उध्दवजी भोसले हे होते.
श्री भालेराव यांनी मागील अनेक वर्षापासून शैक्षणिक व अन्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांनी व त्यांच्या सौभाग्यवती संघमित्रा भालेराव यांनी स्वीकारला. या वेळी डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.नागनाथ कोतापल्ले, माजी मंत्री बाळासाहेब जाधव,
विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ, जोगेंद्र सिंह बिसेन, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ सर्जेराव शिंदे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास राठोड, वडील रामा भालेराव,आई सौ.राधाबाई भालेराव,व्याही मच्छिंद्र गायकवाड, सौ.नागरबाई मच्छिंद्र गायकवाड,जावई विजय कांबळे,सूकन्या सौ.पुनम कांबळे,बालाजी भालेराव,साधना भालेराव, डॉ.एम.एस.पाळेकर, सिनेट सदस्य डॉ.संजीव रेड्डी, महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. गुरुनाथ कल्याण,माजी प्राचार्य डॉ.रामकृष्ण बदने,स्टाफ सेक्रेटरी डॉ. व्यंकट चव्हाण,कार्यालय अधीक्षक रमेश गोकुळे हे उपस्थित होते.
या वेळी वरील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्कृष्ट शिक्षक (ग्रामीण) हा पुरस्कार याच महाविद्यालयातील माजी प्राचार्य डॉ.रामकृष्ण बदने यांनाही प्रदान करण्यात आला. या दोघांचेही अभिनंदन खालील मान्यवरांनी केले आहे.
त्यात विमुक्त जाती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कर्मवीर किशनराव राठोड, संस्थेचे विद्यमान सचिव प्राचार्य गंगाधरराव राठोड,मुखेडचे आमदार डॉ. तुषारजी राठोड,संस्थेचे सहसचिव गोवर्धन पवार,सदस्य संतोष राठोड, संस्थेचे सदस्य मुख्या.गोविंद पवार,वि.जा.से. समितीतील सर्व शाखाप्रमुख,सर्व प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी मुखेडच्या विविध चळवळीतील मान्यवर तसेच मित्र,आप्तेष्ट, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी केले आहे.