ऊस उत्पादकात ऊस कारखान्याला घालण्यासाठी शेतकऱ्यांची होते पराकाष्टा ;
बारूळ परिसरातील चित्र…
अजूनही एक हजार च्या वर हेक्टर ऊस शिल्लक!
बारुळ ; विशेष प्रतिनिधी
बारूळ परिसरात नविन व जुना असा 2 हजार हेक्टर च्या वर ऊस ची लागवड असून तालुक्यात ऊस कारखाना नसल्यामुळे परिसरातील तालुक्यातील कारखान्याला ऊस घालण्यासाठी येथील शेतकऱ्यांना अनेक अडचणीला सामोरे जाऊन ऊस कारखान्याला घालण्यासाठी पराकाष्टा करावी लागत आहे यामुळे शेतकरी हतबल झाले आहे याकडे मात्र तालुक्यातील लोकप्रतिनिधीचे यावर दुर्लक्ष आहे.
मानार प्रकल्प बारूळ व पेठवडज येथील मध्यम प्रकल्प या दोन्ही प्रकल्पाच्या परिसरात बारूळ ,चिंचोली, बाचोटी वळसंग वाडी , राहटी , वरवंट , तेलुर , कवठा ,औराळ , मंगल सांगवी , पेठवडज , मसलगा , गोनार , येलूर यासह 30 ते 40 गावात 2 हजार च्या वर हेक्टर नवीन व खोडवा ऊस लागवड शेतकऱ्यांनी केली .
याच तालुक्यातील शेतकऱ्याचे दुर्भाग्य असे आहे की पाणी आहे शेतकरी कष्टाने उसाची लागवड करून भरघोस ऊस उत्पादन घेत असतात परंतु तालुक्यातून उसाचा कारखाना नसल्यामुळे ऊस कारखान्याला घालण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जाऊन कारखान्याच्या संचालकाची हात जोडूनी करून ऊस घालण्यासाठी शेतकऱ्यांना मागील दहा वर्षापासून विनवणी करावी लागत आहे .
ऊस उत्पादक शेतकरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात असूनही तालुक्यात ऊस कारखान्यासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधीने लक्ष घातले नाही मागील अनेक वर्षापासून जिल्ह्यासह परिसरातील जिल्ह्यातील दुष्काळाचे चटके मुळे जिल्ह्यासह परिसरातील जिल्ह्यातील कारखान्याला उसासाठी या परिसरातील शेतकऱ्यांना विनवणी करावी लागत होती .
परंतु मागील दोन वर्षापासून प्रचंड पाऊस झाल्यामुळे जे कारखाने दार या शेतकऱ्यांना विनवणी करायचे तेच आज उघड्यावर सोडत आहेत सध्या बारूळ व पेठवडज परिसरात अजूनही दीड हजार हेक्टर ऊस तोडणीसाठी शिल्लक आहे .
सध्या या परिसरात वागल वाडा बालाघाट शेवडी ऊस कारखाना टोळ्या असून या यात सर्वाधिक बार्हाळी ऊस कारखाना आज या परिसरात देवदूत बनले असून इतर कारखाने ज्यांना दुष्काळामध्ये इथून ऊस मिळायचा ते आज बारूळ परिसराला उघड्यावर सोडत आहेत .
त्यामुळे शेतकरी इतर कारखान्या बद्दल नाराजी व्यक्त होत आहे याकडे मात्र कोणताही लोकप्रतिनिधीही शेतकऱ्यांच्या मदतीला धावत नाहीत त्यामुळे शेतातील ऊस कारखान्याला जाण्यासाठी शेतकऱ्यांना ऊस तोड कामगारांना आर्थिक रसद वाहनचालकांना आर्थिक रसद यासह त्यांना गोड तिखट जेवणाचा आस्वाद सह अनेक त्यांची मर्जी राखावे लागत आहे असे परा कष्ट करुन ऊस शेतातील काढावे लागत आहे .
बारूळ परिसरातून शंभर हेक्टर
च्या वर आज पर्यंत ऊस तोड करून कारखान्याला गेला असून कारखान्याचे चेअरमन घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बारुळ परिसरातील शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये सर्व ऊस ऊस तोड होईल असे आश्वासन दिले आहे .
मोहन नाईक
अँग्रो ओरसेल
बर्हाळी ऊस कारखाना
बारूळ परिसरात अजूनही नवीन व खोडवा असा 1000 च्या वर हेक्टर ऊस तोड शिल्लक आहे जिल्ह्यासह परिसरातील जिल्ह्यातील दुष्काळात या परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याला मदत केली याची जाणीव राहावी त्यांनी या परिसरातील ऊस उत्पादकांना सहकार्य करावे .
गोविंद अंतापुरे
शेतकरी , बारुळ