नांदेड ; प्रतिनिधी
बहुजन भारत पार्टी च्या पदाधिकारी सर्व पदाधिकाऱ्यांना सुचित करण्यात येते की आपल्या सर्वांचे आदर्श भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार यांचा 6 डिसेंबर या दिवशी महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे आपल्या सर्वांचे अधिक कर्तव्य की आपण सर्वांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या जवळ पार्टीच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम करण्यात आला आहे
तेव्हा या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बहुजन भारत पार्टी जिल्हा प्रभारी नांदेड प्रमुख पाहुणे बालाजी गजले बहुजन भारत पार्टी राष्ट्रीय कोषाध्यक्ष तरी सर्व बहुजन भारत पार्टीच्या जिल्हा कार्यकारणी, शहर कार्यकारणी व दक्षिण विधानसभा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला नांदेड रेल्वे स्टेशन येथेअभिवादन करण्यासाठी दिनांक 6 .12. 2021रोजी ठीक दहा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तेव्हा आपण सर्वांनी शक्यतोवर पांढऱ्याशुभ्र गणवेश यामध्ये उपस्थित रहावे त्या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आपण तयारीने यावे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय अरुण गऊळकरकर करतील तर आभार प्रदर्शन अशोक वाघमारे हे करणार आहेत.