किनवट येथून ५० रुग्ण मेघे सांगवी वर्धा येथे तपासणी व शस्त्रक्रियसाठी रवाना

किनवट प्रतिनिधी

किनवट: किनवट विधानसभा मतदार संघातील ५० रुग्ण दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचलित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सांगवी वर्धा येथे तपासणी व शस्त्र क्रियेसाठी रवाना झाले.

सामाजिक बांधिलकीच्या सदभावनेतून मा.आ.भीमरावजी केराम साहेब यांच्या लोकार्पण कार्यालयाच्या वतीने रुग्ण सेवेचे महानकार्य करणाऱ्या रुग्ण सेवक श्री.कुंदन उदावंत (बोधडी) श्री.राजू शीरपूरे (पाटोदा), श्री. आशन्ना आल्लावार (मांडावा) यांचे कौतुक करून संदेश भीमराव केराम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना फळे, मास्क,पाणी बॉटल वाटप करण्यात आले.

याप्रसंगी श्री.प्रकाश कुडमेथे, अनिरुद्ध केंद्रे, गोवर्धन मुंडे, प. स. सदस्य नीलकंठ कातले, सभापती प्रतिनिधी दत्ता आडे, मारोती भरकड, संतोष मरस्कोल्हे,दत्ता भीसे, अनिल कनाके सरपंच पिंपळगाव. जगदीश तिरमानवार, देवराव ऍण्ड्रलवार, बजरंग चौधरी,आरोग्य सेविका रेखा मेश्राम, रेखा धडेकर, किरण गुरनुले, मनीषा डोईफोडे, यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *