उमरा सर्कल वासियांच्या च्या वतीने आमदार शामसुंदर शिंदे यांचा सत्कार

लोहा (प्रतिनिधी)


लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय ,कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी वेळोवेळी तळमळीने पाठपुरावा करून लोहा-कंधार मतदार संघामध्ये कोट्यावधी रुपयांची विकासकामे खेचून आणण्यात यश मिळवले असून दोन दिवसापूर्वी लोहा व कंधार तालुक्यात २० जलसिंचन प्रकल्प व कंधार तालुक्यामध्ये चार जलसिंचन प्रकल्पाला शासनाची मंजुरी मिळून आणण्यासाठी आमदार श्यामसुंदर शिंदे यशस्वी झाले आहेत,

या 24 सिंचन प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे आमदार शामसुंदर शिंदे यांनी स्पष्ट केले आहे, उमरा सर्कल मधील सर्व प्रतिष्ठित नागरिक , सरपंच, उपसरपंच व कार्यकत्यांच्या वतीने काल गुरुवारी आमदार शामसुंदर शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे, युवा नेते विक्रांत दादा शिंदे, यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले,

यावेळी उमरा सर्कल च्या वतीने जिल्हा नियोजन समिती सदस्य बालाजीराव वैजाळे ,. ,चिंचोली चे सरपंच गोविंदराव पाटील चिंचोलीकर, राजू पाटील कापसीकर, वाका चे सरपंच गोपीराज पा. हंबर्डे, धनज चे सरपंच पंजाब पाटील माळेगावे, डोणवाडा उपसरपंच हनुमंत पाटील जाधव, हातनीचे माजी सरपंच सुनील भदरगे,उद्धव भरकडे, श्याम पाटील सावळे, खरेदी-विक्री संघाचे संचालक अनिकेत पाटील जोमेगावकर,

,सुरेश पाटील येळीकर, सुदाम कौडगावकर, अविनाश उमरेकर,सह उमरा सर्कल मधील सर्व सरपंच ,उपसरपंच, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या वतीने लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय ,कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांचा सत्कार करून लोहा ,कंधार मतदार संघामध्ये 24 जल सिंचन प्रकल्पाला मंजुरी मिळवून आणल्याबद्दल अभिनंदन व कौतुक करण्यात आले . यावेळी उमरा सर्कल मधील शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *