जागतिक दिव्यांग दिनी कंधार तहसिल कार्यालयात तहसिलदार संतोष कामठेकर यांच्या वतीने सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

जागतीक दिव्यांग दिनी तहसिल कार्यालयात
तहसिलदार संतोष कामठेकर यांनी आज शुक्रवार  03 डिसेंबर 2021 रोजी तहसिल कार्यालय कंधार येथे  संजय गांधी विभागाच्या वतीने जागतीक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.

तहसिल कार्यालय येथे कामानिमित्त आलेल्या दिव्यांगबांधवांना प्रतिनिधीक स्वरुपात पुष्पहार, पुष्ठगुच्छ व मिठाई देऊन शुभेच्छा तहसिल कार्यालयाच्या वतीने देण्यात आल्या.

या वेळी तहसिलदार  संतोष कामठेकर दिव्यांगाविषयी आमचे कार्यालय सहानुभुतीपुर्वत व प्राधान्याने विचार करुन त्यांच्या अडचणी सोडवीण्याचा प्रयत्न करील असे सांगीतले.


या प्रसंगी संजय गांधी विभागाच्या प्रमुख नायब तहसिलदार नयना कुलकर्णी यांनीही सर्व दिव्यांग बांधवांना भगीनींना शुभेच्छा दिल्या. दरम्यान दिव्यांग संघटनेकडून तहसिलदार श्री संतोष कामठेकर यांचे स्वागत करण्यात आले व अनुदान वाढीचे निवेदन देण्यात आले.


                यावेळी तहसिलदार संतोष कामठेकर, नायब तहसिलदार तथा संजय गांधी शाखेच्या प्रमुख श्रीमती नयना कुलकर्णी, संजय गांधी विभागाचे महसूल सहाय्यक श्री बारकुजी मोरे, निवडणूक समन्वयक मनमथ थोटेगुरुजी,संगणक परीचालक संगमेश्वर टोपारे, श्रीमती मनीषा वाघमारे सह, समीतीचे माझी सदस्य विश्वांबर बसवंते, पत्रकार सिंकदरभाई , प्रहार दिव्यांग संघटनेचे शहराध्यक्ष दस्तगीर छोटुमीयॉ, महीला तालुकाध्यक्ष संगीता वाखरडकर,धम्मपाल वाघमारे,सुलतान कासीम,मनमथ देवणे, शेख जावेद,प्रिन्स रंभाबाई काळे, नामदेव गंदलवाड,साहेबराव पवार, आदींची उपस्थीती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *