दिलदार मित्र संदीप पवार सर खरोखरच संदीप सर आणि माझी ओळख याच वर्षी झाली सन 2020 मध्ये.. आज दि.१९ अॉगस्ट रोजी प्रा.संदीप सरांचा वाढदिवस आहे त्याबद्दल मला दोन शब्द लिहावे असे वाटले .म्हणून थोडासा केलेला हा प्रयत्न ….
कंधार येथील आमचे मित्र साजिद फाउंडेशनचे प्राध्यापक साजिद सर यांनी त्यांच्या कंधार येथिल इन्स्टिट्यूट मध्ये विद्यार्थ्यांचा गुण गौरव व सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमासाठी मी स्वतः मी स्वतः प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होतो. साधारणपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आमचे मित्र शंतनु कैलास सर यांनी चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती .त्याच्या शाळेत आणि ती शाळा पणा याच मुखेड रस्तावर .तो दिवशी या रस्त्याने फारच गर्दी होती.
साजिद इन्स्टिट्यूट येथे गुणगौरव दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शेख साजिद सर यांनी आयोजित केला होता .मी सदिच्छा आणि भेट देऊन जावो म्हणून या कार्यक्रमाला हजेरी लावली होती माझा मित्र कैलास गरुडकर रफिक व अन्य पालक या ठिकाणी उपस्थित होते. माझी पालकाची भूमिका म्हणून मी या ठिकाणी बजावत होतो ,माझी मुलगी कुमारी आभा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होती.ती व तिचे मैत्रिणी यांनी हा कार्यक्रमाचा सर्व सुत्रसंचलनाचा भार स्वतःकडे घेतला होता आणि माझी पालक म्हणून गाईड म्हणून एक पालकांची भूमिका होती.
कार्यक्रमाचा वेळ हा लांबत होता म्हणून सर्व विद्यार्थी पालक प्रमुख पाहुण्याची वाट पाहत होते. मला पण कुतहल झालं की कोण येत आहे नेमकं .उशीर होत असल्याने शेख साजीद सरांनी सांगितलं की कार्यक्रम सुरू करा , प्रमुख अथिती येत आहेत परंतु कार्यक्रम सुरू झाला नाही .थोड्याच वेळात कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी हजेरी लावली.त्यामध्ये प्रा.हिंदसर व प्राध्यापक पवार असे अतिथी आले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं आणि प्रमुख उपस्थितीत व कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथीचे व्यास पिठावर उपस्थितांचे मान्यवरांचा सत्कार केल्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा सोहळा सुरू झाला.
त्यामध्ये प्राध्यापक पवार सर यांना ऐकण्याची उत्सुकता कंधारच्या विद्यार्थ्यांमध्ये होतीच. वकृत्व शैलीतून आपले ज्ञानाचे डोस पाजताना पवार सर कधी अभिनेता, कधी प्राध्यापक ,कधी विद्यार्थी तर कधी मित्र अशा भूमिका वटवत होते. वेळ झाला तरीही विद्यार्थी सरांच्या या भाषणाकडे डोळे लावून टक लावून ऐकत होते, पाहत होते ,आनंद घेत होते, टाळ्या वाजवत होते आणि त्यामध्ये मी देखील होतो. आपसूकच सरांची नाना पाटेकर यांच्या आवाजात बोलणे ,नाना पाटेकर चा अभिनय, नाना पाटेकर यांचे डायलॉग आणि त्यामधून विद्यार्थ्यांना यशाचे होणारी मार्गदर्शन निश्चितच मनाला भावत होते.
विद्यार्थी मन लावून ऐकत होते हे सर्व चालू असताना सरांच्या मनामध्ये विचार होती ती सुरेख होते. त्यामुळे विद्यार्थी ऐकत होते उद्याच्या जीवनाचे धडे घेत होते. आणि खरच सरांनी आपल्या वेगळ्या अभिनयाच्या शैलीतून आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या श्रोत्यांना खेळत ठेवलं होतं आणि तोच क्षण मला त्यावेळी आवडला .विद्यार्थी आणि शिक्षक यांचे समन्वय महत्वाचे आहे हे जाणवल .
प्रा.संदीप पाटील पवार सर यांचे जवळपास ५५ मिनीटे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना झाले.महत्वाचा संदेश होता तो जिवनात भेदभाव नको .जिवनात यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही ,विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवून त्याच्या प्रती अभ्यास केला पाहिजे असा संदेश याठिकाणी देण्यात आला .विविध अभ्यासक्रम, यशस्वी विद्यार्थ्यांचे गाथा सांगत या ठिकाणी प्राध्यापक पाटील सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते मार्गदर्शन निश्चितपणे येणाऱ्या भविष्याच्या स्पर्धेमध्ये कामी पडणारे आहे असेच प्रेरणा मनोगत विद्यार्थ्यांना वेळोवेळी यांच्या माध्यमातून मिळत राहो .
प्राध्यापक पवार सर व साजीद सर यांची मैत्री अतूटपणे पुढे राहावे आणि हे साजीद सरचे ब्रँड नावारूपाला येण्यासाठी निश्चित सर्वांचा मित्रांचा सहभाग लाभावा एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करुन पुन्हा एकदा प्राध्यापक पवार सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.
दिगांबर वाघमारे ,कंधार