कवितेने मनोरंजना सोबतच समाज परिवर्तन व प्रबोधनाचे सामाजिक भान जपले पाहिजे.
कोरोना सारख्या महामारीच्या काळात संपूर्ण देश लॉक डाऊन झालेला असताना सर्व साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन अगदी ठप्प झाले. देशभर भीतीचे सावट पसरलेले असताना ,लोक घरांत अडकून पडलेले असताना साहित्यिक आणि कलाकारांनी मात्र आपल्या अभिव्यक्तीसाठी कमालीचा व प्रभावी मार्ग निवडला.
तो म्हणजे फेसबुक पेजेस लाईव्ह , युट्यूब अशा सोशल मीडियाचा अगदी नेमका व चपखल वापर करण्यात आला.आणि घर बसल्या सगळ्यांना कविता,संगीत अशा अनेक कार्यक्रमांचा लाभ घेता आला. लॉक डाऊन मुळे साहित्यिक व कलाकारांची होत असलेल्या घुसमटीला मोकळा श्वास या माध्यमातून मिळाला.
सोशल मीडियावर अशा राबवल्या उपक्रमांपैकी फेसबुकवर असाच एक सर्वात दीर्घकाळ चाललेला प्रभावी दर्जेदारव रसिकांनी प्रचंड डोक्यावर घेतलेला उपक्रम म्हणजे पुण्यातील कवी , गजलकार,संगीतकार,गायक विजय वडवेराव यांनी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध संगीतकार गायक व लोककवी प्रा.प्रशांत मोरे यांच्या कवितांवर व चालींवरआधारीत राबवलेल्या अतिशय दर्जेदार उपक्रम कवी,संगीतकार,गायक विजय वडवेराव यांनी प्रशांत मोरे यांच्या तब्बल ३० कवितांचे चालींसहित गायन करून सादरीकरण केले.जवळपास सलग दीड महिना हा उपक्रम सुरू होता.
संगीत नाटक वगैरे अशा संकल्पना अस्तित्वात आहेतपण काव्य केंद्रबिंदू मानून गेय कविता कशी असावी,ती कशी सादर केली जावी, गेय कवितांच्या चाली कशा असाव्यात, यासाठी आजवर साहित्य विश्वात जी संकल्पना आली नाही ती “संगीत काव्य” ही संकल्पना कवी , संगीतकार गायक विजय वडवेराव यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून साहित्य विश्वात आणली.
आजपर्यंत साहित्य विश्वात मोठं मोठे नामवंत कवी होऊन गेले.पण कोणत्याही एका कवीच्या इतक्या मोठ्या प्रमाणात कविता दुसऱ्या एका कवीने प्रत्यक्ष मंचावर किंवा सोशल मीडियावर सादर केलेल्या नव्हत्या. पण इथेज्याने हा उपक्रम सादर केला तो स्वतः एक नामवंत कवी,संगीतकार,गायक अशा चौफेर भूमिका यशस्वीपणे बजावतो आहे आणि ज्याच्या कवितांवर व चालींवर हा उपक्रम राबवण्यात आला तोही स्वतः एक मोठा संगीतकार ,गायक व लोककवी आहे. हा योग दुर्मिळ आहे.आजवर असे मराठी किंवा हिंदी साहित्य विश्वात घडलेले नव्हते.पण विजय वडवेरावांनी ते घडवून आणले व मराठी साहित्य विश्वाला ” संगीत काव्य ” ही नवी संकल्पना दिली.
महत्वाचे म्हणजे या लॉक डाऊन च्या काळात अनेक फेसबुक पेजेस वर कवितांचे शेकडो लाईव्ह कार्यक्रम झाले पण ते वेगवेगळ्या कवींनी सादर केले पण “कविता प्रशांताच्या” या संगीत काव्याच्या उपक्रमांतर्गत कवी,संगीतकार,गायक विजय वडवेराव यांनी एकट्याने दररोज किंवा दिवसाआड संगीतकार गायक कवी प्रशांत मोरे यांच्या प्रत्येक भागात चाली सहित एक नवीन कविता अशा तब्बल ३० भागात ३० कवितांचे गायन करून सादरीकरण केले.
जवळपास दीड महिना इतका दीर्घकाळ एकाच कवीने एकट्याने सातत्य कायम राखून नेपथ्यासह सादर केलेला हा लॉक डाऊनच्या काळातला सर्वात जास्त काळ चाललेला व दर्जेदार उपक्रम ठरला.मनोरंजनातून प्रबोधन हा या उपक्रमाचा मूळ हेतू होता.कविता ही जनसामान्यांची,अगदी तळागळाल्या माणसाची,दबलेल्या पिचलेल्या पिडीत वंचित शोषित माणसाची असावी व त्यांच्यासाठीच असावी. कवितेने मनोरंजना सोबतच समाज परिवर्तन व प्रबोधनाचे सामाजिक भान जपले पाहिजे.
राबणाऱ्या कष्टणाऱ्या देहांच्या घामाचा दरवळ कवितेत असावा, बुद्ध, कबीर,तुकारामफुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ, यांचे समाज हितवादीविचार पेरणारी कविता असावी. भाषा व प्रांत वाद यांना बगल देऊन समतेच्या नदीसारखी सम्यक प्रवाही कविता असावी.
कवितेतून देशाच्या संविधानाचा प्रचार प्रसार व्हावा. लोकांचे हक्क अधिकार व कर्तव्य सांगणारी कविता असावी. आर्थिक, शैक्षणिक, साहित्यिक,वैचारिक,सांस्कृतिक,राजकीय अशा सर्व प्रकारच्या सामाजिक विषमता जगाच्या वेशीवर टांगणारीकविता असावी आणि महाकवी वामनदादा कर्डक यांनीशेवट पर्यंत अशाच प्रकारची कविता लिहून जनजागृती व प्रबोधन केले.त्यांचाच वारसा पुढे लोककवी प्रशांत मोरे यांनी सशक्त पणे चालवला आहे .
कवी विजय वडवेराव हे सुध्दा याच सम्यक विचार धारेचे कवी आहेत. या कवितांच्या चाली अतिशय दर्जेदार आहेत. लोकसंगीतातूनच शास्त्रीय संगीताचा जन्म झाला हे या कवितांच्या चालींतून पटायला लागते. कवी संगीत कार गायक प्रशांत मोरे यांच्या काव्यात, चालीत,गायकीतएक फकिरी आढळते. वैराग्य आढळते. एकंदरीत कबीर पंथाची ही गायकी आहे. अशी एकंदरीत भूमिका या” कविता प्रशांताच्या या संगीत काव्य मैफली च्या उपक्रमातून विजय वडवेराव यांनी अतिशय प्रभावी व दर्जेदारपणे मांडली आहे.
संगीतकार गायक लोककवी प्रशांत मोरे यांच्या मैना उडून जाईन, जिणं फाटतंया, तुझा हात परीस,ही वाट तुडवते तुझ्या घराचे दार, आम्हीजी शिवबाची तलवारराजा रजवाड्याची तू माझं फकीर घराणं, कुठे तरी भेटलेले जीव जिव्हाळ्याचे झाले, काही चुकलेल्या दिशा, दे रे आभाळा दे पाणी, बाग गुलाबी जाळून, जिवलगा रे मैतरा,माय तान्ह्या लेकराला,गहू दयस बाजरी दयस अशा प्रकारे तब्बल ३० कवितांचे सुरेल दमदार व उत्कृष्ट नेपथ्यासह सादरीकरण रसिकांना प्रचंड आवडले व हा उपक्रम खूप लोकप्रिय ठरला.
कवी, गजलकार संगीतकार गायक विजय वडवेराव हे उत्कृष्ट सुरेल सादरीकरणकरून रसिक जनांचे जवळपास दीड महिना मनोरंजनातून प्रबोधन केले.महाकवी वामनदादा कर्डक संगीत काव्य लोक घराण्याची मुहूर्तमेढ कवी ,संगीतकार ,गायक ,विजय वडवेराव व संगीतकार,गायक लोककवी प्रा.प्रशांत मोरे यांनी रोवली.आणि विजय वडवेरावांनी “संगीत काव्य” ही नवी अतिशय भव्यदिव्य व दर्जेदार संकल्पना साहित्य विश्वाला दिली.या उपक्रमाचे ” चला, आंनदाच्या वाटेवरचे प्रवासी होऊया”हे घोषवाक्य अतिशय लोकप्रिय ठरले.
रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१