अशोक कुंभार यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

सेलू ; प्रतिनिधी


सेलू तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देऊळगाव गात येथील शिक्षक श्री अशोक कुंभार यांना त्यांच्या 15 वर्षे सेवेतील शैक्षणिक व सामाजिक कार्याबददल मानव विकास संस्थेच्यावतीने लातूर येथे दि.21नोव्हें.रोजी दयानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.


जागतिक कीर्तीचे नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व आदर्श गाव हिवरे बाजार चे प्रणेते पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवी प्रा. इंद्रजित भालेराव होते. तर राज्यमंत्री मा.संजय बनसोडे, शिक्षक आमदार मा. विक्रम काळे, पद्मश्री गोरक्षक श्री शब्बीर सय्यद, प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञ डॉ विठ्ठलराव लहाने. डॉ रागिणी पारेख तसेच मानव विकास संस्थेचे संस्थापक मा वसंतराव घोगरे सर आदि मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *