उमरी तालुक्यातील बितनाळ येथील बालाजी लालू बोक्कावाड यांनी कर्ज बाजारीला कंटाळून आत्महत्या केली.

उमरी प्रतिनिधी.



उमरी तालुक्यातील बितनाळ येथील रहिवासी बालाजी लालू बोक्कावाड यांनी दि.२४ नोव्हेंबर रोजी त्यानीं त्यांच्या दुकान समोर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला व नांदेड येथील विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना दि.३ डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.


बालाजी लालू बोक्कावाड यांनी सततच्या नापिकीमुळे कर्ज बाजारी झाल्या मुळे औषध पिंवून आत्महत्या केल्याची घटना त्यांच्या कुटुंबाकडून व्यक्त होत आहे.
त्यांच्या पार्तीवदेहावर बितनाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले गावाकऱ्याकडून हळहळ व्यक्त होत आहे, या वेळी गणेश अनेमवाड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, मारोती वाघमारे सरपंच,देविदास अक्कमवाड उपसरपंच,गोविंद बक्केवाड गोल्ला गोलेवार समाज जिल्हा उपाध्यक्ष, साहेबराव तुरेराव पत्रकार, पिंटू नागदरवाड भाजपा जिल्हा सरचिटणीस, आदी उपस्थित होते, बालाजी बोक्कावाड यांच्या पश्च्यात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ बहीण असा मोठा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *