लोहा, कंधार ( प्रतिनिधी )
लोहा-कंधार मतदारसंघातील शेतकऱ्यांना सतत होणाऱ्या विजेच्या समस्येमुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मोठा त्रास व नुकसान होत असून रब्बी हंगामात शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा करण्याच्या संदर्भात व मतदार संघातील शेतकऱ्यांच्या वीज बिलाच्या अडचणी सोडवण्या संदर्भात काल शनिवारी लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांच्या निवासस्थानी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मतदारसंघातील काही भागात विजेचा कमी दाबाने पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारीचे नुकसान होत आहे,
रोहित्रा मध्ये वेळोवेळी होणारे बिघाड या समस्यांमुळे वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत असल्याने विजेच्या अडचणी संदर्भात उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्यात आली, या बैठकीस युवानेते विक्रांत दादा शिंदे, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता श्रीराम भोपाळे, कार्यकारी अभियंता चव्हाण, कार्यकारी अभियंता नर गुलवार,अतिरिक्त कार्यकारी अभियंता महेश पा.वाघमारे, उपकार्यकारी अभियंता दवंडे, यांच्याशी आमदार शिंदे यांनी मतदार संघातील शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्या संदर्भात व विविध अडचणी संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा केली
तसेच मतदार संघातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात विजेचा तुटवडा भासू देऊ नका व विजेच्या संदर्भात व वीज बिलाच्या संदर्भातील विविध अडीअडचणी वर तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी आमदार शिंदे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या, लोहा-कंधार मतदारसंघात नवीन चार विद्युत उपकेंद्रा ना तात्काळ मंजूरी व निधी उपलब्ध करण्याच्या मागणीसाठी नुकतीच आमदार शिंदे यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची मंत्रालयात भेट घेऊन निवेदन दिले होते, या मुंबई भेटीत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी लोहा ,कंधार मतदार संघात नवीन चार वीज उपकेंद्रा ना लवकरच मंजुरी व निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले आहे,
मतदारसंघातील संघातील रोहित्र बिघाड, डीपी च्या समस्या, ऑइल व शेतकऱ्यांच्या वीजबिला संदर्भातील अडचणी तात्काळ दूर करून उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी बैठकीत आमदार शिंदे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.