काँग्रेस नेते सचिन सावंत दोन दिवसांच्या नांदेड जिल्हा दौऱ्यावर

नांदेड,दि. 6 – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस व काँग्रेस नेते सचिन सावंत उद्या दि. 7 डिसेंबर पासून दोन दिवसांच्या नांदेड दौऱ्यावर येत आहेत.
सचिन सावंत यांचे दि.7 डिसेंबर रोजी दुपारी 12.45 वा. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरुन हैद्राबादकडे प्रयाण होईल. दु.2.05 वाजता हैद्राबाद विमानतळावरुन नांदेडकडे मोटारीने प्रयाण व नांदेड येथे मुक्काम राहील.


बुधवार दि. 8 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित केलेल्या काँग्रेस कार्यकर्ता संवाद कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 12.30 वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर यांच्या शिवाजीनगर येथील निवास्थानी भेट.


सायंकाळी 5.15 वाजता नवामोंढा येथील नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद. त्यांचे गुरुवार दि. 9 डिसेंबर रोजी सोयीनुसार हैद्राबादकडे प्रयाण होणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी आज येथे दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *