कंधार : प्रतिनिधी
ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफ कंधार तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त थायलेसिमीया पिडीत मुलांसाठी सोमवारी दि.६ डिसें.रोजी कंधार नगर परिषदेसमोर सकाळी दहा ते सायं.५ वाजेपर्यंत महा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यक्रमाचे उदघाटक सय्यद मुर्तजा मोहियोद्दीन सजादे नशिन बडी दर्गाह शरिफ, कंधार आणि प्रमुख उपस्थिती नगरसेवक तथा नगराध्यक्षा प्रतिनिधी शहाजी नळगे, जफरोद्दीन बाहोद्दीन उपनगराध्यक्ष, पोलीस निरीक्षक एस.आर.पडवळ, वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर, ग्रामसेवक संघटना तालुकाध्यक्ष गंगाधर कांबळे, मराठवाडा विदर्भ अध्यक्ष अब्दुल बशीर माजीद, जिल्हा उपाध्यक्ष मोईन खुरेशी जिल्हा सचिव प्रो.जुबेर खान आदींच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कोरोना काळात सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत आहे. अशा परिस्थितीत ‘थॅलिसीमियाग्रस्त’ मुलांना रक्ताचा पुरवठा होणं देखील कठीण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर ऑल इंडिया तन्जीम ए इंसाफ संघटनेच्या वतीने महारक्तदान शिबीर आयोजित केले आहे. या रक्तदान शिबिरात जागरूक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तंजीम ए इन्साफ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून रक्तदान शिबिरास सुरुवात केली. थैलेसीमिया पीडित मुलाचे वडीलांनी थैलेसिमिया रुग्णांवर उपचारादरम्यान किती अडचणीचा सामना करावा लागतो याबाबत माहिती दिली आणि पीडित व पिडितांच्या परिवाराला खूप हालअपेष्टा सहन करावे लागत आहेत त्यामुळे सर्वांनी रक्तदान साठी पुढाकार घ्यावा असे मत व्यक्त केले. थॅलेसेमियाग्रस्त मुलांना रक्तपुरवठा करणाऱ्या शासकीय रक्तपेढी नांदेड येथे जमा करण्यात आले आहे.
या शिबिरास माजी जि प सदस्य डॉ.पुरुषोत्तम धोंडगे, वंचित जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, शिवसेनेचे मुक्तेश्वर धोंडगे, बाळासाहेब क-हाळे, परमेश्वर जाधव, निरंजन वाघमारे, पंडित देवकांबळे, नगरसेवक मन्नान चौधरी, नगरसेवक सुधाकर अण्णा कांबळे, नगरसेवक प्रतिनिधी गणेश कुंटेवार, नगरसेवक अरुण बोधनकर, नगरसेवक प्रतिनिधी बालाजी पवार,
नगरसेवक प्रतिनिधी शेख असिफ, नगरसेवक प्रतिनिधी शैलेश बोरलेपवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवराज धर्मापुरीकर राष्ट्रवादी शहराध्यक्ष राजकुमार केकाटे, शेकापचे शेरू भाई, एम आय एम चे तालुकाध्यक्ष मोहम्मद हामेदोदीन, शेख हाब्बु, शेख सुलतान, अहमद चौधरी, हमीद मोलीसाब, गंगाधर कहाळेकर, शेख नईम, परशुराम केंद्रे, आदींनी भेट दिली.
सदर शिबीर यशस्विरित्या पार पाडण्यासाठी शहराध्यक्ष सय्यद सादत, हाजी शेख, जुबेर शेख, अॅड शहबाज खान, विक्रांत हिवाळे, शेख आसिम, शेख आरेश, सुमित हिवाळे, आकाश कदम, निहाल अहमद मंसूरी, अन्सार पठाण आदींनी परिश्रम घेतले.