नांदेड- पत्रकार हे समाजाच्या उन्नतीसाठी निष्ठापुर्वक काम करीत असतात. त्यांच्यासह ग समाजातील इतर घटकांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची मोफत काळजी घेणारे डॉ. अशोक बोनगुलवार यांचा सेवाभाव प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन नांदेड वाघाळा शहर महापालीकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी शुक्रवारी येथे बोलताना केले.
नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ , श्री.स्वामी समर्थ फाउंडेशन व श्री. चंद्रप्रभा होमियो क्लिनिक यांचा संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या ८२ व्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील पत्रकार ,माध्यम कर्मचारी ,वर्तमानपत्र वितरक आणि त्यांच्या कुटुंबियांची मोफत आरोग्य तपासणी व होमिओपॅथीक उपचार शिबिर शुकवारी श्री. चंद्रप्रभा होमिओ क्लिनिक, शिवाजीनगर, येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
त्यावेळी ते उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
या वेळी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. हंसराज वैद्य,अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस चारुदत्त चौधरी ,विभागीय सचिव प्रकाश कांबळे,परिषदेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख ऍड दिगांबर गायकवाड, प्रसिद्ध वास्तूशास्त्रज्ञ शिरीष पुरोहित, वृतपत्र वितरक संघटनेचे सरचिटणीस गणेश वडगावकर, श्यामराव कदम होमिओपॅथी कॉलेजचे प्राचार्य संजय पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या भाषणात आयुक्त डॉ. लहाने पुढे म्हणाले की, येथील पत्रकारांची सकारात्मक विचारधारा विकास प्रक्रियेला सदैव सहकार्य करते.पत्रकार हा सदैव चौकस, निरीक्षणात्मक, अभ्यासू वृतीने प्रशासनाच्या प्रत्येक बाबीवर नजर ठेऊन असतो. याचे भान ठेऊनच सर्वांना काम करावे लागते.
महानगर पालिकास्तरावर पत्रकारांच्या काही अडी अडचणी असतील किंवा त्यांचे काही प्रश्न असतील तर ते सोडविण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू, असे आश्वासन आयुक्त डॉ. लहाने यांनी दिले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. हंसराज वैद्य, विभागीय सचिव प्रकाश कांबळे यांची समयोचित भाषणे झाली. त्यांनी आपल्या भाषणात नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ व डॉ. अशोक बोनगुलवार यांचे कौतूक केले.
प्रारंभी होमिओपॅथीक चे जनक डॉ. सॅम्युअल हनिमन व
मराठी पत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर, यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून आयुक्त डॉ सुनील लहाने यांचा हस्ते दीप प्रज्वलन शिबीराचे उद्घघाटन करण्यात आले.
त्यानंतर श्री. स्वामी समर्थ फाऊंडेशनच्या फिरत्या होमिओपॅथी दवाखान्याचे लोकार्पण आयुक्त डॉ. लहाने यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक भाषणात डॉ. अशोक बोनगुलवार यांनी भुमिका विषद केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सरचिटणीस सुभाष लोणे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष लक्ष्मण भवरे यांनी मानले. शेवटी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने डॉ. अशोक बोनगुलवार यांचा मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या हस्ते भारतीय संविधान देऊन कृतज्ञतापुर्वक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास डॉ. ओमप्रकाश कुचन, डॉ. अमोल रवंदे, डॉ. दीपक पित्ती, डॉ. संतोष खरात, डॉ. सौ. रश्मी बंगाळे, डॉ. सौ. अर्चना उपलेंचवार, डॉ. सौ. विद्या कौंडा वार, डॉ. सौ. मैथिली डोईलोड सौ. दीपा बोनगुलवार, संजय भंडारी, प्रशासिक अधिकारी भगवान शेट्टे, केंद्र नायक अरुण परिहार, नितिन बोनगुलवार, पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष गोवर्धन बियाणी,
जिल्हा समन्वयक कृष्णा उमरीकर, जिल्हा उपाध्यक्ष यासीन इनामदार, आजम बेग, महानगर अध्यक्ष विश्वनाथ देशमुख,महानगर कार्याध्यक्ष रवींद्र संगनवार, सचिव संभाजी सोनकांबळे, कंधार तालुका अध्यक्ष ऍड सत्यनारायण मानसापुरे, प्रमोद गजभारे, चंदन मिश्रा, दिपंकर बावस्कर, अहेमद करखेलीकर सुभाष काटकांबळे हाफिज घडीवाला,
राजकुमार स्वामी, रविकिरण कुलकर्णी, इंजि. गजानन कानडे, संघरत्न पवार, बळवंत अटकोरे, बी.जी. शेख यांच्यासह शहरातील व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.
शिबिर यशस्वीतेसाठी
मारोती गोरे, केशव गोरे ,कृष्णा जाधव, शेख अकबर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर पत्रकार, वितरक आणि त्यांचे कुटुंबिय व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.