स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे : सौ.आशाताई शिंदे उमरा सर्कल मधील कार्यकर्त्यांच्या व पदाधिकार्‍यांच्या वतीने आमदार श्याम सुंदर शिंदे यांचा भव्य सत्कार

लोहा /मारतळा (प्रतिनिधी)


लोहा ,कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांनी मोठ्या प्रयत्नाने लोहा, कंधार मतदार संघात नवीन २४ जलसिंचन प्रकल्पाला शासनाची मंजुरी मिळवून आनल्यामुळे या भागातील हजारो हेक्टर शेतीला या नवीन जलसिंचन प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे,

उमरा सर्कल मध्ये नुकत्याच मंजूर झालेल्या नवीन जल सिंचन प्रकल्पाचा समावेश असल्याने उमरा सर्कलमधील सरपंच, उपसरपंच व कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांच्या वतीने आमदार श्यामसुंदर शिंदे यांचा भव्य सत्कार करण्यात आला, यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील उपस्थित होते. यावेळी मारतळ्याचे सरपंच भास्करराव पाटील ढेपे, जोमेगावचे सरपंच आदिनाथ पाटील शिंदे, धनज बुद्रुक चे माजी सरपंच पप्पू भूरे , गोळेगाव चे सरपंच कैलास पाटील ढाले, सु गावचे सरपंच विजय पा.जाधव, प्रभाकर शिंदे, मनोहर भुरे, सचिन कुदळकर, ज्ञानेश्वर पाटील ढेपे, बालाजी बीचेवाड,

काशीराम गायकवाड, नागोराव कापसे, रामा कापसे, सुरेश ढगे, कैलास कोल्हे, पत्रकार बाळासाहेब शिंदे, श्याम सावळे , ,रणजित शिंदे, दादाराव ढगे,सह उमरा सर्कल मधील शेकडो कार्यकर्त्यांसह सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच यांच्या वतीने लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे, युवा नेते विक्रांत दादा शिंदे यांचा भव्य सत्कार करून अभिनंदन करण्यात आले, ..

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी प्रलंबित असलेल्या विविध अशासकीय समितींच्या निवडी व संजय गांधी निराधार योजना समिती लवकर गठीत करण्याची मागणी आ. श्याम सुंदर शिंदे यांच्या कडे केली, लोहा ,कंधार तालुक्यातील सर्व अशासकीय समित्या लवकरच गठीत करण्यात येणार असल्याचे यावेळी आमदार शिंदे यांनी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *