नांदेड- पांगरी डेंटल कॉलेज मधील विद्यार्थिनी कु. श्वेता प्रभाकर बिरादार ही नुकत्याच जाहीर झालेल्या बी.डी.एस अंतिम वर्षाच्या परीक्षेत 69% घेऊन प्रथम श्रेणी सह उत्तीर्ण झाली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या यशाचे श्रेय तिने आई-वडील, बहीण व सर्व शिक्षकांना दिले आहे. डॉक्टर श्वेता हि छत्रपती चौकातील श्री गुरुजी रुग्णालय येथे उपव्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या माननीय प्रभाकर बिरादार यांची कन्या आहे.