होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त कंधार येथिल शासकीय बांधकाम विभाग परिसराची केली स्वच्छता

कंधार ;

नागरी संरक्षण व महाराष्ट्र राज्य होमगार्ड सघंटनेचा 75 वा वर्धापनदिन व अमृत मोहत्सवी वर्षाचे औचित्य साधून आज रविवार दिनांक 7 डिसेंबर रोजी कंधार येथिल शासकीय बांधकाम विभाग परिसराची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

मुख्यालयाचे आदेशान्वये जिल्हयात महाराष्ट्र राज्य होमगार्ड सघंटनेचा 75 वा वर्धापनदिन व अमृत मोहत्सव वर्ष आज रविवार दिनांक 07/12/2021 ते 13/12/2021 या सप्ताहात पथकाचे ठिकाणी संदर्भीय पत्रा मध्ये नमुद प्रमाणे विविध कार्याक्रमांचे आयोजन करून साजरा करावा.
निलेश मोरे जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक नांदेड यांनी दिल्या होत्या.

त्यानुसार कंधार येथिम शासकीय बांधकाम विभाग परिसराची साफ सफाई मोहीम कंधार तालुका समादेशक अधिकारी होमगार्ड पथक बालाजी डफडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.

यावेळी तालुका समादेशक अधिकारी बालाजी डफडे,(पलटण नायक)जी. जी. खेडकर ,भिमराव जोंधळे , राजकुमार कदम, कपंनी सा.मेजेर शिवाजीराव गवळे, सारजेंट व्हि बी तळणीकर , रघुनाथ करेवाड , बालाजी मुसळे , शेख महेबूब , दत्ता गायकवाड ,भानुदास केंद्रे , शंकर बामनवाड , सुरेश गिते , बापूराव ढेबरे , माधव शिंदे , पांडुरंग सोनकांबळे , कैलास
मुसळे , परमेश्वर तेलंग ,भगवान घुगे , गजानन गीते ,नारायण केंद्रे , सुमन फुले , निर्मला वाघमारे , सुनिता गिते ,संगीता गुट्टे यांच्यासह कंधार पथकातील 45 पुरुष- महिला होमगार्डस यांनी परिश्रम घेतले .

( महिला) सुमन फुले , निर्मला वाघमारे , सुनिता गिते ,संगीता गुट्टे यांच्यासह कंधार येथिल होमगार्ड यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *