होमगार्डनी आरोग्याची काळजी घेणे काळाची गरज अप्पर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक निलेश मोरे यांचे प्रतिपादन

नांदेड/बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि कामाचा ताणतणाव यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी, विकार होतात परिणामी कौंटुबिक स्वास्थ बिघडून जाते. त्यामुळे सर्वांनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या स्वास्थ्याची काळजी घेणे आज काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक तथा होमगार्ड जिल्हा समादेशक निलेश मोरे आज रविवारी येथे बोलताना केले .


होमगार्ड पथक नांदेड, श्री स्वामी समर्थ फाउंडेशन, व श्री चंद्रप्रभा होमिओ क्लिनिक, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने होमगार्ड महाराष्ट्र राज्य च्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आज रविवारी जिल्हा प्रशिक्षण केंद्, होमगार्ड जिल्हा नांदेड, भाग्यनगर जवळ नांदेड येथे श्रमदान तसेच होमगार्ड व त्यांच्या कुटुंबीयांची मोफत आरोग्य तपासणी व होमिओपॅथिक औषध उपचार शिबिराचे उद्घघाटक म्हणून ते बोलत होते. या वेळी प्रशासिक अधिकारी बी.टी. शेट्टे, केंद्र नायक अरुण परिहार यांची प्रमुख उपस्थिती होती.


आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत नवनविन वेगवेगळे आजार बळावत आहेत, हे गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या उद्रेकापासून आपण पाहत आहेत. अशा विदारक परिस्थितीत स्व : त, त्याचबरोबर आपल्या कुटुंबियांचे शारिरिक स्वास्थ कायम निरोगी राहिल याची काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम, योग, ध्यानधारणा आणि संतुलित आहार याचा दैनंदिन जीवनात समावेश करणे अत्यावश्यक आहे. याची विशेष खबरदारी सर्वांनी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.


पोलिस आणि होमगार्ड यांच्यात शिस्तीला विशेष महत्व आहे. त्यामुळे शिस्तीचे प्रत्येकांनी काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.


पद सोपानानुसार कनिष्ठ यांनी वरिष्ठांना आदर, मान सन्मान केला पाहिजे. बेशिस्त वर्तन करणाऱ्या होमगार्डची गय केल्या जाणार नाही, त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मोरे यांनी दिला. तसेच सर्वांनी आपल्या कर्तव्या प्रती एकनिष्ठ राहून सचोटी व इमानदारीने सेवा बजवावी असे आवाहन त्यांनी केले.


केंद्र नायक अरुण परिहार यांनी प्रास्ताविक भाषणातून होमगार्ड संघटनेची माहिती दिली. प्रारंभी होमगार्ड संघटनेचे संस्थापक तथा माजी पंतप्रधान स्व. मोरारजीभाई देसाई, सीडीएस स्व. बिपिन रावत यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करुन श्रध्दांजली वाहण्यात आली.

केंद्र नायक अरुण परिहार यांनी अपर पोलिस अधीक्षक तथा होमगार्ड जिल्हा समादेशक निलेश मोरे यांचा यथोचित सत्कार केला. शिबिर आयोजनाबद्दल श्री.एस.एस. फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा कंपनी नायक डॉ. अशोक बोनगुलवार यांचा जिल्हा समादेशक निलेश मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्र.समादेशक अधिकारी प्रकाश कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार पलटन नायक अटकोरे यांनी मानले.


या कार्यक्रमास पलटन नायक रवि जेंकूट, बी.जी. शेख, नरेंद्र जोंधळे, बालाप्रसाद जाधव, देविसिंह राजबन्सी, सुभाष. मांजरमकर, रविराज कोकरे, छाया वाघमारे, सुनिता कुलकर्णी, मंगल केदारे, द्रोपदा ओढणे, साधना सरपाते, सुनिता थोरात, संगीता गोडबोले, पंचफुला सावंत, छाया पद्मावार, मारोती गोरे, केशव गोरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

शिबिरानंतर होमगार्ड व त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. सकाळी जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या कवायत मैदानावर श्रमदान करुन साफ सफाई करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *