श्री क्षेत्र शंभूकडा महादेव यात्रे निमित्ताने व लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंढे यांच्या जयंतीनिमित्त भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

श्री क्षेत्र शंभूकडा महादेव यात्रे निमित्ताने व लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंढे  यांच्या जयंतीनिमित्त भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन समाजसेवक मारुती भाऊ गवळे यांच्या हस्ते करण्यात आले
     
      सोमठाणा ता. कंधार येथील गावांमध्ये दरवर्षी प्रमाणे ही याहीवर्षी ग्रामीण भागात प्रत्यक्षात लोकांना क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आणि आपल्या ग्रामीण भागातून चांगला एखादी क्रिकेटपटू निर्माण करण्यासाठी या उद्देशाने संकल्पना पुढे घेऊन ग्रामीण भागातला. कुठेतरी चांगला खेळाडू बनावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

         ग्रामीण भागातल्या मुलांना कुठेतरी प्रेरणा देण्यासाठी खेळाची आवड निर्माण करण्यासाठी आदरणीय श्री संदीप भाऊ गिते (मुंबई पोलीस) यांच्यातर्फे ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे सोमठाणा या परिसरातील नागरिकांचे आनंदाचं वातावरण निर्माण झालेला आहे.

         आज त्याच योगायोग साधून 12 डिसेंबर 2021 बहुजना चा बुलंद आवाज लोकनेते वंजारी समाजाचे दैवत, माजी. उपमुख्यमंत्री. केंद्रीय ग्रामविकास मंत्री , लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब, यांच्या जयंती निमित्ताने हा उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे.

        कार्यक्रमाचे उद्घाटन मारुती भाऊ गवळे, प्रमुख पाहुणे सुग्रीव गुट्टे,  व्यवस्थापक उत्तमराव गिते माजीसरपंच,मुरलीधर गिते, बालाजी गिते सरपंच,तिरुपती गिते लिपिक, सिद्धेश्वर होनराव, सुनील गिते, महेश गिते ज्ञानेश्वर वाघमारे, ज्ञानेश्वर गिते, रामेश्वर गिते, परमेश्वर गिते, संतोष केंद्रे, विकास गिते, परमेश्वर होनराव,नामदेव गितेआदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *