एस.टी. कामगारांच्या मागण्या पूर्ण करून बस सेवा सुरु करा व विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय टाळा -संभाजी ब्रिगेड कंधार तालुका अध्यक्ष नितीन पाटील कोकाटे

कंधार प्रतिनिधी,

वाडी, तांडे, सावडत खेडोपाड्यातून तालुक्याला जोडणारी गोरगरीबांची सुखकर सेवा देणारी एसटी जगली पाहिजे, आणि तीचा चालक व वाहकही.
एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करून बस सेवा तात्काळ सुरू करून विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवावी. या मागणीचे निवेदन आज मा. तहसीलदार साहेबांना देण्यात आले.
या वेळी संभाजी ब्रिगेड चे कंधार तालुका अध्यक्ष नितिन कोकाटे, सागर मंगनाळे,
योगेश पाटील ,शंकर केंद्रे, सचिन भुरे, श्रीमंगले ऋषीकेश यांच्या व शेकडो विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या सह्यांचा अर्ज जोडण्यात आला.


ज्या प्रकारे माजी आमदारांच्या पेंशन वाढीचे विधेयक विधिमंडळात २ मिनिटांत मंजूर होते. त्यासाठी विधिमंडळात सर्व शक्ती पणाला लागते.
त्याचप्रमाणे एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठीही सरकारने तत्परतेने पुढे यावे.


शेवटी शहरे आणि खेड्यांना जोडणारी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक असलेली लालपरी जगली पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेला तारणारी बस सेवा तात्काळ सुरू व्हावी असे वरिल निवेदकांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *