पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल

वल्लभभाई पटेलांचे कतृत्व, देश एकसंघ केल्याने कळले! पहिल्या उपपंतप्रधान पदावर, पोलादी पुरुष विराजमान झाले! करबंदीचा सत्याग्रह यशस्वी, केल्याने सरदार उपाधी त्यांना, जनता-जनार्धनांनी बहाल केले! झावरेभाई-लाडाबाईच्या पुताने, अखंड भारताचे स्वप्न पूर्ण केले! पोलिस अॅक्शनने संस्थानिकांना, माफी मागण्यास भागच पाडले! निजामशाह अंत्य मीर उस्मान यांनी देशाची शरणागती पत्करले! USAच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला, भारतीय स्टॅच्यू ऑफ युनिटीने, विश्वस्तरावर सध्या फिके पाडले! स्मृतिदिनी सरदारांना अभिवंदन, करतांना गोपाळसुताचे काव्यच, शब्दबिंबातून नतमस्तक झाले!

पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेलजी यांना स्मृतिदिनी
गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी,
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा
यांनी शब्दबिंबातून
केले विनम्र अभिवादन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *