कंधार शहरात एक कोटीच्या कामांचे भूमिपूजन
कंधार- प्रतिनिधी
कंधार – साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत एक कोटी रुपयां कामांस मंजुरी मिळाली असून त्यातील रमाईनगरमधील रस्ते व नाल्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. गत दहा वर्षांनंतर सुरू झालेल्या नगरातील विकासकामांमुळे रमाईनगरवाशिय आनंद व्यक्त करत आहेत.
शहरातील विविध भागात सुरू झालेल्या विकासकामांमध्ये रमाईनगर कमानीपासुन दिलीप कांबळे ते अनिल एंगडे यांच्या घरापर्यंत ४१ लक्ष २३६ रूपयांचा रस्ता व नाली करणे,बौद्ध द्वार वेस ते बंडू जोंधळे यांच्या घरा पर्यंत २५ लक्ष ५७४ रुपयाचा सिमेंट रस्ता व नाली,
साठे नगर येथे किशन कांबळे यांचे घर ते संतोष कांबळे ते मुक्तार कुरेशी यांच्या घरा पर्यंत १० लक्ष ६१५ रुपयांचा सिमेंट रस्ता व बंद नाली,फुले नगर येथे सुरेश जोंधळे यांचे घर ते चांभार वेस पर्यंत २४ लक्ष २८३ रुपयांचा सिमेंट रस्ता व नाली करणे अश्या एकूण १ कोटी १ हजार ७०८ रुपयांच्या विकास कामांना मंजुरी मिळाली आहे.यातील इतर कामासोबत रमाईनगरमधील विकासकामांचा शुभारंभ नगरसेविका वर्षाताई गणेश कुंटेवार व नगराध्यक्ष प्रतिनिधी नगरसेवक शहाजी नळगे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी लोहा-कंधार विधानसभा संघटक तथा माजी बांधकाम सभापती गणेश कुंटेवार,माजी नगराध्यक्ष दगडूभाऊ सोनकांबळे,नगरसेवक डॉ. दिपक बडवणे,नगरसेविका प्रतिनिधी मगदूम कुरेशी,हिंदवि बाणा चे संपादक माधव भालेराव,सिकंदर भाई, अॅड.कलीम,किरण कांबळे,वैजनाथ जक्कलवाड यांची उपस्थिती होती.
गत दहा वर्षांत विकास न झाल्याने नगरात सुरू झालेल्या विकास कामामुळे नागरिकांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.विकासकामांने रमाईनगरमधील रस्ते व नाल्या झळकणार आहेत. ह्या भूमिपूजना वेळी नगरातील मुरलीधर गवळे,जतीन एंगडे,दिलीप कांबळे, मोहन वाघमारे,आदेश एंगडे,पंढरी वाघमारे,राजरत्न गायकवाड,संतोष गवळे,शोभाताई एंगडे,मंदा कांबळे,
कल्पना ढवळे,सय्यद भुर्राबाई,ताई गंगावणे,सखुबाई वाघमारे,अजिंक्य कांबळे, स्वप्नील सोनकांबळे,शेख जमीर, पेंटर सोनकांबळे यांच्या सह भागातील प्रतिष्ठित नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.