चलो कंधार ………चलो कंधार
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची प्रलंबित प्रश्नांसाठी आंदोलनाची हाक…
जुन्या पेन्शन साठी धरणे आंदोलन
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या “बोधगया” (बिहार) येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या सभेतील ठरावानुसार जुन्या पेन्शनसह प्रलंबित प्रश्नांसाठी देशभर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार
➡️ आपल्या कंधार तालुका तहसिल कार्यालया समोर
🔴 एक दिवसीय धरणेआंदोलन कार्यक्रम
➡️ १७ डिसेंबर २०२१ रोज शुक्रवार दुपारी २ ते ४
🔴 प्रमुख मागण्या
१)जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
२) शिक्षण सेवक पद्धत बंद करून,नियमित शिक्षकाची नेमणूक करावी तसेच कार्यरत शिक्षणसेवकांचे मानधन वाढवण्यात यावे .
३) नव्या शैक्षणिक धोरणातील शिक्षण व शिक्षक विरोधी तरतुदी वगळण्यात याव्यात.
(शाळा समुह योजना,स्वयंसेवक नेमणे, पुर्व प्राथमिक शिक्षणासाठी अप्रशिक्षित शिक्षकांची नेमणूक)
४) सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करुन ,खंड दोन प्रकाशित करण्यात यावा.
५)जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तात्काळ सुरु करण्यात यावी.
६)शिक्षकांना १०,२०,३० वर्षानंतरची आश्वासित प्रगती योजना लागू करावी.
७) संगणक परीक्षा उत्तीर्णतेला मुदतवाढ देण्यात यावी व वसुली थांबवण्यात यावी.
८)पदवीधर शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी देण्यात यावी.
९)शिक्षकांना रजारोखीकरणाचा लाभ देण्यात यावा.
१०)वस्तीशाळा शिक्षकांची मुळनियुक्ती पासून सेवा धरुन वरीष्ठश्रेणीचा लाभ द्यावा.
११) शिक्षण विभागातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी.
१२) केंद्रप्रमुखांची१००% पदे पदोन्नतीने शिक्षकांतून भरण्यात यावी.
१३)निवासाची व्यवस्था होत नाही तो पर्यंत मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी
१४ ) सहाव्या वेतन आयोगातील पाचवा हप्ता, व सातव्या वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता जमा करणे.
आदी मागण्यांसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती.
……विनित……
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका कंधार