काँग्रेस पक्षाच्या वचननाम्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन



नांदेड,दि.17-नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, नायगाव व माहूर या नगरपंचायतीच्या निवडणुका 21 डिसेंबर रोजी होत आहेत. या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदिने उतरला असून मागील कार्याचा आढावा घेत भविष्यातील विकासाचे संकल्प सांगणारा नगरपंचायत निहाय वचननामा काँग्रेस पक्षाने तयार केला असून या तिन्हीही वचननाम्यांचे प्रकाशन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते नायगाव येथील जाहीरसभेत करण्यात आले.


अर्धापूर, नायगाव व माहूर या तिन्हीही नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने स्वतंत्रपणे वचननामा तयार केला आहे. या प्रकाशन सोहळ्यास माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर,माजी खा.तुकाराम रेंगे पाटील, आ.अमरनाथ राजूरकर, आ.जितेश अंतापूरकर, महापौर सौ.जयश्री पावडे, माजी आ. वसंतराव चव्हाण, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, जि.प.चे शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, उद्योजक मारोतराव पवळे गुरुजी, माजी महापौर अब्दुल सत्तार, कोषाध्यक्ष विजय येवनकर, प्रवक्ते संतोष पांडागळे, तालुकाध्यक्ष संभाजी भिलवंडे, उपनगराध्यक्ष विजय चव्हाण, बंडू चव्हाण, श्रीनिवास चव्हाण, आनंदराव चव्हाण आदींची उपस्थिती होती.

Hmm ujj


काँग्रेस पक्षाने जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा तयार केलेला जाहीरनामा नसून पक्षाचा वचननामा आहे. या वचननाम्यातील प्रत्येक वचन पूर्ण करण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाची असेल अशी निसंदिग्ध ग्वाही पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी यावेळी दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *