माहूर (ता.प्र.पवन कोंडे )
माहूर नगर पंचायतीच्या 13 वॉर्डाची निवडणूक येत्या 21 डिसें. रोजी पार पडणार आहे. त्या निमित्ताने शुक्र. दि.17 डिसें. रोजी दु.2 वा. नगर पंचायतीच्या प्रांगणात पार पडलेल्या सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना नांदेड जिल्ह्याचे माजी पालक मंत्री डी. पी. सावंत यांनी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोकरावजी चव्हाण यांनी माहूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण व डीपीटीसीच्या माध्यमातून भरीव निधी दिला आहे. राष्ट्रीय राजकारणात त्यांचा प्रभाव वाढला आहे.त्यांचे हात अधिक मजबूत करण्यासाठी माहूरकरांनी काँग्रेसच्या 13 ही उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
या सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. वजाहत मिर्जा, स्थाई समितीचे माजी सभापती वीरेंद्र सिंह, ऍड. निलेश पावडे, ,तालुकाध्यक्ष संजय राठोड,वरून राठोड, किसन राठोड या मान्यवरासह काँग्रेसच्या उमेदवारांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
पुढे बोलताना डी. पी. सावंत यांनी माहूर शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी खात्री दिली. आ. वजाहत मिर्जा यांनी काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा पक्ष असल्याचे सांगून शायरीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनकी बात या कार्यक्रमाची चांगलीच खिल्ली उडविली. यावेळी रहेमत अली, किसन राठोड,प्रा. राजेंद्र केशवे,वसंत कपाटे, नवीन राठोड यांची समयोचीत भाषणे झालीत.
जयकुमार अडकीने यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचल कांबळे सर यांनी तर आभार प्रदर्शन दिलीप मुनगिनवार यांनी केले. यावेळी नांदेड, किनवट येथील मान्यवरांसह शहरातील नागरिक व महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.