प्रश्न सुटेपर्यंत मी व खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आपल्या सोबत आहोत….सौ प्रणीता चिखलीकर
प्रश्न सुटेपर्यंत मी व खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आपल्या सोबत आहोत….सौ प्रणीता चिखलीकर
कंधार ; अँड सागर डोंगरजकर
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने दिलेल्या हाकेनुसार अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा कंधार च्या वतीने जुनी पेन्शन सह शिक्षकांच्या इतर मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
अखिल शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील मारतळेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात आंदोलन कर्त्यांनी ‘एकच मिशन जूनी पेन्शन’ या घोषणेनी तहसिल परिसर दणाणून सोडला. तालुकाध्यक्ष हनमंत जोगपेटे व मुनेश शिरसीकर यांनी उपस्थितांना अंनदोलनाची भूमिका स्पष्ट केली.
या आंदोलनास भाजपा महिला मोर्चा प्रदेशात उपाध्यक्षा तथा जिल्हा परीषद सदस्य सौ प्रणीताताई चिखलीकर,यांनी भेट देऊन आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य होईपर्यंत मी व खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब पण सोबत आहोत जिल्हा परिषद स्थरावर च्या ज्या मागण्या आहेत. त्या पुढील होनार्या बैठकीत निश्चित मांडेन पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल .
यावेळी सोबत कंधार नगरपालिका उपाध्यक्ष जफर बाहोद्दीन, भाजपा शिक्षक आघाडी कंधार तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे, भाजपा शहराध्यक्ष अँड गंगाप्रसाद यन्नावार,भाजपा शहर सरचिटणीस मधुकर डांगे,भाजपा शहर उपाध्यक्ष शंतनु कैलासे,नगरपालिका माजी नगराध्यक्ष प्र. चेतन भाऊ केंद्रे,भाजपा तालुका सोशलमीडीया प्रमुख अँड सागर डोंगरजकर, नगरपालिका सदस्य सुनील कांबळे , प्रभाकर कदम सर,अविनाश गीते, श्याम पाटील शिंदे ,
यांच्यासह विविध शिक्षक सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देत पाठींबा दिला.
यावेळी आंदोलन कर्त्यांनी तहसिलदारा मार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले या निवेदनात पुढील प्रश्नांवर शासन प्रशासनाचे लक्ष वेधून ते सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.
१)जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
२) शिक्षण सेवक पद्धत बंद करून,नियमित शिक्षकाची नेमणूक करावी तसेच कार्यरत शिक्षणसेवकांचे मानधन वाढवण्यात यावे .
३) नव्या शैक्षणिक धोरणातील शिक्षण व शिक्षक विरोधी तरतुदी वगळण्यात याव्यात.
(शाळा समुह योजना,स्वयंसेवक नेमणे, पुर्व प्राथमिक शिक्षणासाठी अप्रशिक्षित शिक्षकांची नेमणूक)
४) सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करुन ,खंड दोन प्रकाशित करण्यात यावा.
५)जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तात्काळ सुरु करण्यात यावी.
६)शिक्षकांना १०,२०,३० वर्षानंतरची आश्वासित प्रगती योजना लागू करावी.
७) संगणक परीक्षा उत्तीर्णतेला मुदतवाढ देण्यात यावी व वसुली थांबवण्यात यावी.
८)पदवीधर शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी देण्यात यावी.
९)शिक्षकांना रजारोखीकरणाचा लाभ देण्यात यावा.
१०)वस्तीशाळा शिक्षकांची मुळनियुक्ती पासून सेवा धरुन वरीष्ठश्रेणीचा लाभ द्यावा.
११) शिक्षण विभागातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी.
१२) केंद्रप्रमुखांची१००% पदे पदोन्नतीने शिक्षकांतून भरण्यात यावी.
१३)निवासाची व्यवस्था होत नाही तो पर्यंत मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी
तालुका स्तरीय मागण्या
१४) वारंवार मागणी करूनही न मिळणारा लोहा
या आंदोलनात जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, तालुक्यातील शिक्षक शिक्षीका
आदींसह अनेकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.
यावा.
१५) सहाव्या वेतन आयोगातील पाचवा हप्ता, व सातव्या वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता जमा करणे.