कंधार ;
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने दिलेल्या हाकेनुसार अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा कंधार वतीने जुनी पेन्शन सह शिक्षकांच्या इतर मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संयुक्त सरचिटणीस मा दिलीपराव देवकांबळे व जिल्हाध्यक्ष अशोक पाटील मारतळेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात आंदोलन कर्त्यांनी ‘एकाच मिशन जूनी पेन्शन’ ही घोषणेनी तहसिल कार्यालय दणाणून सोडले
यावेळी आंदोलन कर्त्यांनी तहसिलदारा मार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले या निवेदनात पुढील प्रश्नांवर शासन प्रशासनाचे लक्ष वेधून ते सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.
१)जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
२) शिक्षण सेवक पद्धत बंद करून,नियमित शिक्षकाची नेमणूक करावी तसेच कार्यरत शिक्षणसेवकांचे मानधन वाढवण्यात यावे .
३) नव्या शैक्षणिक धोरणातील शिक्षण व शिक्षक विरोधी तरतुदी वगळण्यात याव्यात.
(शाळा समुह योजना,स्वयंसेवक नेमणे, पुर्व प्राथमिक शिक्षणासाठी अप्रशिक्षित शिक्षकांची नेमणूक)
४) सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करुन ,खंड दोन प्रकाशित करण्यात यावा.
५)जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तात्काळ सुरु करण्यात यावी.
६)शिक्षकांना १०,२०,३० वर्षानंतरची आश्वासित प्रगती योजना लागू करावी.
७) संगणक परीक्षा उत्तीर्णतेला मुदतवाढ देण्यात यावी व वसुली थांबवण्यात यावी.
८)पदवीधर शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी देण्यात यावी.
९)शिक्षकांना रजारोखीकरणाचा लाभ देण्यात यावा.
१०)वस्तीशाळा शिक्षकांची मुळनियुक्ती पासून सेवा धरुन वरीष्ठश्रेणीचा लाभ द्यावा.
११) शिक्षण विभागातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी.
१२) केंद्रप्रमुखांची१००% पदे पदोन्नतीने शिक्षकांतून भरण्यात यावी.
१३)निवासाची व्यवस्था होत नाही तो पर्यंत मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी
तालुका स्तरीय मागण्या
१४) वारंवार मागणी करूनही न मिळणारा लोहा तालुक्यातील डी.सी.पी.एस धारकांच्या कपातीचा हिशोब देण्यात यावा.
१५) सहाव्या वेतन आयोगातील पाचवा हप्ता, व सातव्या वेतन आयोगाच
आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी ॲड.मा . विजयकुमार धोंडगे जि. प. सदस्य नांदेड ,मा . प्रणिताताई देवरे चिखलीकर जि. प. सदस्या नांदेड ,मा पंडित आण्णा देवकांबळे माजी सभापती पं .स. कंधार , मा .दिगांबर वडजे पं .स . सदस्य कंधार ,मा सुधाकर सुर्यवंशी पं .स .सदस्य कंधार ,मा बालाजी चुक्कलवाड जिल्हाध्यक्ष माजी सैनिक संघटना नांदेड ,मा गंगाप्रसाद यन्नावार शहर अध्यक्ष भाजपा ,मा जफर शेठ उपनगराध्यक्ष , कंधार ,मा चेतन भाउ केंद्रे माजी नगराध्यक्ष,मा. शंतनू कैलासे शहर उपाध्यक्ष भाजपा ,मा मधु पाटील डांगे ,शाम पाटील शिंदे ,सुनिल कांबळे माजी नगरसेवक भाजपा तालुका सोशल मिडियाप्रमुख ॲड सागर डोंगरजकर ,प्रभाकर कदम सर आदीसह इतर सामाजिक संघटनेच्या मान्यवरांनी आजच्या धरणे आंदोलनास उपस्थित राहुन जाहीर पाठिंबा दिला .
त्याचबरोबर सदर धरणे आंदोलनास इतर शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी यांनी विषेश म्हणजे शिक्षक कॉग्रेसचे राज्याउपाध्यक्ष मा एन एम वाघमारे ,तालुकाध्यक्ष मन्मथ थोटे ,
भाजापा शिक्षक आघाडी तालुका अध्यक्ष राजहंस शाहापुरे ,पुरोगामी शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष युसुफ शेख सर ,तालुकाध्यक्ष मोबीन शेख सर,कृषी सेवक संघटना ,ग्रामसेवक संघटना ,आरोग्य संघटना इ शिक्षक संघटनेने धरणे आंदोलनास उपस्थित राहुन जाहीर पाठिंबा दिला .
यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य संयुक्त सरचिटणीस मा दिलीपदादा देवकांबळे ,केंद्रप्रमुख संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मा बी जी डफडे ,अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ,मा अशोक पाटील मारतळेकर ,जिल्हा सल्लागार भागवत पाटील ,तुळशिराम केंद्रे ,जयवंत काळे पाटील ,जिल्हा नेता विजय पल्लेवाड ,जिल्हा सहसचिव ए डी पंदिलवाड ,जिल्हा उपाध्यक्ष मुनेश शिरशीकर ,मुर्तुज शेख ,रवी राठोड ,पदो . मु अ संघटनेचे तालुकाध्यक्ष तानाजी कुट्टे ,सचिव उल्हास राठोड ,लोहा तालुकाध्यक्ष मंगल सोनकांबळे ,
कंधार तालुका नेता व्यंकटी ढोणे ,कंधार तालुकाध्यक्ष हाणमंत जोगपेटे ,तालुका सचिव विकास राठोड ,तालुका वरिष्ट उपाध्यक्ष माने विष्णुदास ,कार्याध्यक्ष पिराजी केंद्रे ,प्रवक्ता प्रदिप गित्ते ,सतिश भंडारे ,उद्धव तुपकर ,सुर्यकांत बोंबले ,रविराज केसराळीकर ,आनंदा पांचाळ ,अतुल कांबळे ,गोविद सुर्यवंशी ,साहेबराव शिंदे ,गजानान पांचाळ ,बालाजी जाधव ,संजय मेकाले ,रामदास गुट्टे ,मेहरबान पवार ,
बंडु चव्हाण ,
बालाजी सादु ,शिवाजी पवळे ,उल्हास कराड ,लोहाळे प्रवीण ,मधुकर चव्हाण , भुरे शिवसांब ,सरवरी सर श्रीकांत ,कल्याणकर ,गंद्रेवाड ,पंडित वडजे ,तेलंगे परमेश्वर ,पांचाळ के एस ,परमेश्वर मोरे साहेब महिला आघाडी तालुका सचिव सौ रुपांजली नामवाड ,सौ मोरताडे मुक्ताई ,नागरगोजे ज्योती ,मनिषा वाघमारे आदीसह शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते व पत्रकार बांधवही उपस्थित होते .