पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत—-जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात स्व. राजीव गांधी जयंती साजरी-

नांदेड, दि. 20 –

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती गुरुवारी (दि.20) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात गुुरुवारी (दि.20) दुपारी 12 वाजता भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांनी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत,आ. मोहन हंबर्डे, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, प्रदेश सरचिटणीस बी.आर .कदम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.मंगाराणी अंबुलगेकर, महापौर दिक्षाताई धबाले, उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर, माजी महापौर बलंतसिंघ गाडीवाले, सभागृहनेते विरेंद्रसिंघ गाडीवाले,

बांधकाम सभापती संजय बेळगे, स्थायी समिती सभापती अमित तेहरा, उपनगराध्यक्ष विजय चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती सुशीला बेटमोगरेकर, गुरुद्वारा बोर्डाचे सचिव रविंद्रसिंघ बुंगई, माजी सभापती किशोर स्वामी, अनिता हिंगोले,  मजुर फेडरेशन चेअरमन लक्ष्मीकांत गोणे, नगरसेवक बालाजीराव जाधव, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कविता कळसकर, नगरसेवक रमेश गोडबोले, अमित काबरा,

प्रमोद भुरेवार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पु कोंढेकर, शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे,  माजी उपमहापौर शमीम अब्दुला, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष गंगाधरराव सोंडारे, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे,सचिव उमाकांत पवार, अब्दुल गफार, राजेश पावडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *